अमरावती - मंगळवारी कोरोनाचे 7 नवे रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 185 वर पोहोचली आहे. यापैकी 15 जणांचा मृत्यू झाला असून 92 रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत.
अमरावतीत शिवनगर हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला असून या भागात मंगळवारी 21, 45 आणि 48 वर्ष वयाच्या तीन महिला आणि 31 वर्ष वयाचा एक पुरुष कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यासह रातनगंज परिसरात 64 वर्षीय पुरुष, रतनगंज परिसरात 20 वर्षीय महिला कोरोनाबाधित असून शहरातील फ्रेजारपुरा या आणखी एका दाट वस्ती असणाऱ्या भागात पहिल्यांदाच कोरोना रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. फ्रेजारपुरा परिसरातील रहिवासी असणाऱ्या 62 वर्षाच्या पुरुषाला कोरोना असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या ही अमरावतीकरांमध्ये धास्ती निर्माण करणारी आहे.