ETV Bharat / city

Ramdas Athavle PC In Amravati : अग्निपथ योजनेत दलितांना आरक्षण मिळावे, रामदास आठवले यांची मागणी - रामदास आठवले अमरावती पत्रकार परिषद

अग्निपध योजना युवकांच्या ( Agneepath Scheme ) लाभाची असून इतर सर्व शासकीय सेवा योजनांप्रमाणे अग्निपथ योजनेतदेखील दलितांना आरक्षण मिळावे, अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भूमिका असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले ( Ramdas Athavle PC In Amravati ) यांनी अमरावतीत आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

Ramdas Athavle PC In Amravati
Ramdas Athavle PC In Amravati
author img

By

Published : Jun 20, 2022, 10:54 AM IST

अमरावती - केंद्र शासनाने युवकांना सैन्यात सेवा देण्यासाठी घोषित केलेली अग्निपथ योजना ( Agneepath Scheme ) अतिशय उत्कृष्ट अशी योजना आहे. या योजनेला होणारा विरोध चुकीचा आहे. योजना युवकांच्या लाभाची असून इतर सर्व शासकीय सेवा योजनांप्रमाणे अग्निपथ योजनादेखील दलितांना आरक्षण मिळावे, अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भूमिका असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले ( Ramdas Athavle PC In Amravati ) यांनी अमरावतीत आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

प्रतिक्रिया

काँग्रेस तरुणांना भडकवत आहे - देशातील लाखो युवकांच्या हितासाठी केंद्र शासनाने अग्निपथ योजना घोषित केली आहे. असे असताना देशाच्या काही भागात केंद्र शासनाच्या योजना विरोधात युवकांनी आक्रमक भूमिका घेत जाळपोळीत सारखे प्रकार केले आहेत. हा प्रकार युवकांनी उत्स्फूर्तपणे केला असेल, मात्र हा विषय ज्वलंत राहावा, यासाठी काँग्रेसच्यावतीने देशातील युवकांना भडकविण्यात येत असल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे.

आरक्षणात मिळणार लाभ - अग्निपथ योजना केवळ दलित किंवा कोण्या एका घटकाच्या फायद्याची नसून देशातील सर्वच तरुणांच्या हितासाठी योजना आहे. तरुणांच्या काही मागण्या असतील तर त्या मागण्यांचा विचार केंद्र सरकारच्यावतीने केला जातो आहे. चार वर्ष या योजने अंतर्गत सैन्यात सेवा देणाऱ्या युवकांना इतर शासकीय सेवांसाठी आरक्षण मिळणार असल्याचेही रामदास आठवले म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपची युती - महानगरपालिका तसेच जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भाजप सोबत युती करून लढणार आहे. भाजपने आम्हाला जागा वाटपात योग्य न्याय द्यावा, या संदर्भात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या सोबत आम्ही चर्चा करीत आहोत. विदर्भात दलितांची संख्या अधिक असून या भागात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बळकट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्व जाती आणि धर्मांना एकत्रित करून बळकट करण्याचे स्वप्न आम्हाला पूर्ण करायचे असल्याचेही रामदास आठवले म्हणाले.

हेही वाचा - MLC Election 2022 Voting : शिवसेना राज्यसभेतील पराभवाचा 'असा' काढणार वचपा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.