अमरावती मेळघाटात लव्ह जिहादचे प्रकरण समोर आल्यावर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ Love Jihad case उडाली. याबाबत खासदार अनिल बोंडे MP Anil Bonde यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुस्लिम युवकासोबत हिंदू युवतीचे लग्न लावून Marriage of Hindu girl with Muslim youth देणाऱ्या अमरावती शहरातील विजय कॉलनी स्थित चंद्रविला धर्मदाय संस्थेच्या विरोधात फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असे आहे संपूर्ण प्रकरण मेळघाटात रुग्णवाहिकेवर चालक असणाऱ्या एका मुस्लिम युवकाने धारणी येथील तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला विश्वासात घेत अमरावती येथील चंद्रविला या संस्थेकडून अवैधरित्या लग्न लावून घेतले होते. Love Jihad case त्या तरुणीला 3 दिवस दाबून ठेवल्यावर तिची प्रकृती ढासल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिला खासदार अनिल बोंडे MP Anil Bonde यांच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी Treatment at District General Hospital दाखल केले होते. या संपूर्ण घटनेनंतर खासदार अनिल बोंडे यांनी मुस्लिमांकडून हिंदूंच्या मुलींना सातत्याने लक्ष केले जात असल्याने याचा परिणाम गंभीर होईल, असा इशारा दिला होता. यासह जिल्ह्यात लव्ह जिहादद्वारे जिल्ह्यातील शेकडो हिंदू युवती बेपत्ता झाल्याचा आरोप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे.
या कलामांतर्गत गुन्हा दाखल मेळघाटात लव्ह जिहाद प्रकरण Love Jihad case समोर आल्यावर खासदार अनिल बोंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरू फ्रेजारपुरा पोलिसांनी चंद्रवीला धर्मदाय संस्थेवितोधात भादवीच्या कलम 468,417 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या आधी मध्य प्रदेशमध्ये लव्ह जिहाद घटना मध्य प्रदेश राज्यातील बैतूलमध्ये लव्ह जिहादचे एक प्रकरण समोर आले आहे. नाव बदलून एका मुस्लिम व्यक्तीने विवाहित महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. चहामध्ये बेशुद्धीचे औषध टाकून तिच्यावर बलात्कार केला. त्याचा व्हिडिओही बनवला. यानंतर, तरुणाने महिलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, पतीपासून वेगळे होण्याचा आणि धर्मांतर करण्याचा दबाव टाकला. अखेर पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य कायदा आणि बलात्काराच्या कलमांखाली गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.