अमरावती - शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची भेट घेतली असेल तर त्यात वावगे काय. भाजपा विरोधासाठी जर मोट बांधली जात असेल तर ते योग्यच आहे. आम्ही जन्मताच भाजपाचे प्रमुख विरोधीपक्ष आहे. परंतु येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुका आम्ही स्वबळावरच लढणार आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व कोरोना रुग्णालयांना भेट देण्यासाठी पटोले सध्या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर असून आज ते दर्यापुरात बोलत होते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल यांची प्रशंसा करण्याची प्रमाणपत्र राऊत यांना दिले नाही. पंतप्रधान हे देशाच सर्वोच्च पद आहे. परंतु त्या पदाची गरिमा देखील नरेंद्र मोदींनी संपवून टाकली आहे अशी जळजळीत टीका देखील नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
'सामान्य कार्यकर्त्यांना आमदार बनवणार'
काँग्रेस पक्षात अनेक आमदार येण्यास इच्छुक आहेत आणि त्यांची यादी ही मोठी आहे. मी आता सामान्य कार्यकर्त्यांना आमदार बनवणार आहे. कारण सामान्य कार्यकर्ताच हा नेता बनवत असतो. त्यामुळे आगामी काळात आमचा सामान्य कार्यकर्ताच सतेच्या स्थानी राहील, असे देखील पटोले म्हणाले.
..तर अमरावती लोकसभा निवडणूक काँग्रेस लढवेल
खासदार नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र सध्या अडचणीमध्ये सापडले आहे. उच्च न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र हे अवैध ठरवले आहे. त्यामुळे कदाचित जर अमरावतीमध्ये पोटनिवडणूक लागली तर तेथे मात्र काँग्रेस आपला उमेदवार उभा करेल असेही पटोले म्हणाले. अमरावतीची जागा ही काँग्रेसची जागा असल्याची आठवणही पटोले यांनी यावेळी करून दिली.
हेही वाचा - ...म्हणून कोव्हॅक्सिनला अमेरिकेकडून नाही मिळाली मंजुरी