अमरावती : गृहकर्ज मिळविण्यासाठी बनावट दस्तावेज देत सात जणांनी एचडीएफसी होम फायनान्सला तब्बल १ कोटी ८६ लाख रुपयांचा चुना (HDFC Bank Fraud in Amravati) लावला. कर्जाचे काही हप्ते थकल्याने हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी एचडीएफसी लिमिटेडचे संदीप अंबुलकर यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी त्या सात जणांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल (Fake Documents for Home Loan by Borrowers ) केले.
अशी आहेत, आरोपींची नावे - रंजीत राऊत (रहाटगाव), निलेश वानखडे (शेगाव रोड), अंकुश राऊत (भाजी बाजार अमरावती), विपुल बगाडे (अकोले रोड), राजू कोलटेके (कोलटेक, भातकुली), विकास कडू (थुगाव), अमरावती व अजय बोज्जे (फ्रेजरपुरा) यांचा समावेश आहे. सातही आरोपींनी बनावट कागदपत्रे बनवून ते खरे आहेत, असे भासविले. एचडीएफसी या गृहनिर्माण वित्तीय संस्थेची १ कोटी ८६ लाख ४४ हजार ४९६ रुपयांनी फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गृहकर्ज मिळविण्यासाठी आरोपींनी ते वरिष्ठ लिपिक, सहायक शिक्षक, ऑपरेशन मॅनेजर असल्याची बतावणी करून तेथे नोकरीवर असल्याबाबतची वेतन पावती, आयकरचा १६ नंबरचा फॉर्म, ओळखपत्र असे खोटे प्रमाणपत्र (HDFC Bank Fraud by Borrowers) दिले.
असा झाला प्रकार उघड मात्र, काही हप्ते भरल्यानंतर त्यांनी भरणा बंद केल्याने एचडीएफसी व्यवस्थापनाकडून चौकशीला सुरुवात झाली. त्या जणांनी ज्या शैक्षणिक संस्था, विदर्भ पाटबंधारे विभाग, स्त्रीधन कॉटनस्पिनमध्ये ते नोकरीला असल्याची कागदपत्रे दिली (Fake Documents for Home Loan in Amravati) होती. त्या सर्व संस्थेशी संपर्क साधला असता, ते सातही जण त्या संबंधित संस्थेत नोकरीस नसल्याचे स्पष्ट झाले. चौकशीदरम्यान आरोपींनी दिलेले दस्तावेजदेखील बनावट बनविल्याचे लक्षात आले.