अमरावती - जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेता अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इतर पोलिसांना सूचना देऊन अशा चोरी उघडकीस आणाव्यात असे निर्देश दिले होते . त्यानुसार शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरणारी एक आंतरराज्य टोळी जेरबंद करून त्यांच्याकडून तब्बल दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दुचाकी चोरांची टोळी जेरबंद आकाश प्रकाश मरकाम, रोशन राजेंद्र टेकाम, स्वप्निल संजय फुके, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून एक चौथा आरोपी फरार आहे .अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्र मोर्शी तालुक्यातील तळशी गावात जाऊन आकाश मसराम याला अटक करून विना क्रमांकाच्या दुचाकी व कागदपत्र बद्दल विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला विश्वासात घेऊन घेऊन त्याची चौकशी केली व मध्यप्रदेशाच्या हद्दीतून दुचाकी चोरी केले आहेत. अशी माहिती त्याच्याकडून मिळाली या वेळी पोलिसांनी तब्बल नऊ दुचाकी जप्त केले आहे .ही कारवाई अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर हरी बालाजी एन, अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे ,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सुरज सुदरकर, दीपक सोनाळेकर आदींनी केली.
हेही वाचा - '.... यापेक्षा गाणे गाण्याकडे लक्ष द्या'; रुपाली चाकणकरांचा अमृता फडणवीसांना सल्ला