ETV Bharat / city

Shailesh malviya Joined Shinde Group : धारणी तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते शैलेश मालवीय शिंदे गटात सामील - एकनाथ शिंदे

दर्यापूर पाठोपाठ आता मेळघाटच्या धारणी तालुक्यात (Dharni taluka) देखील सेनेला खिंडार पडले आहे. धारणी तालुक्याचे शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष शैलेश मालवीय (Shailesh Malviya), सेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात (Shinde Group) सामील झाले आहेत. माजी आमदार अभिजीत अडसूळ यांच्या नेतृत्वात व जिल्हा परिषद अमरावती चे माजी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे व इतरांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे आशीर्वाद घेत, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

Melghat
मेळघाट
author img

By

Published : Jul 26, 2022, 12:44 PM IST

अमरावती: दर्यापूर पाठोपाठ आता मेळघाटच्या धारणी तालुक्यात (Dharni taluka) देखील सेनेला खिंडार पडले आहे. धारणी तालुक्याचे शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष शैलेश मालवीय (Shailesh Malviya), सेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात (Shinde Group) सामील झाले आहेत. माजी आमदार अभिजीत अडसूळ यांच्या नेतृत्वात व जिल्हा परिषद अमरावती चे माजी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे व इतरांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे आशीर्वाद घेत, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

मेळघाटात शिवसेनेत फूट : माजी आमदार अभिजीत अडसूळ सह शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्ता ढोमणे व शैलेश मालवीय यांचा शिंदे गटात प्रवेश घेतल्याने, अमरावती जिल्ह्यासह मेळघाटात सुद्धा शिवसेनेत उभी फूट पडल्याचे पडसाद उमटत आहे. मेळघाटातील ग्रामीण भागाचा अभ्यास असणारे शैलेश मालवीय हे गेल्या अनेक वर्षापासून कट्टर शिवसैनिक म्हणून कार्य करीत आहे. तालुका अध्यक्ष असताना आपल्या कार्यकाळात मेळघाटातील युवकांमध्ये शिवसेनाचे कार्य व मा. बाळासाहेब यांचे विचार पोहोचविण्याचे कार्य त्यांनी केले. शिवसैनिक घडविण्याचे कार्य देखील त्यांनी उत्तम रीतीने पार पाडले होते हे विशेष.

परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत मध्ये शिंदे गटाचे उमेदवार? : शैलेश मालविय हे शिंदे गटात सामील झाल्याने, मालवीय यांच्या ग्रामीण विकास शहरी भागातील संपर्क सूत्रामुळे, मेळघाटात शिवसेनेला मोठी खिंडार पडण्याचे चिन्ह दिसत आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत मध्ये शिंदे गटाचे उमेदवार दिसण्याचे संकेत मिळत आहे. विशेष म्हणजे मेळघाट चे आमदार राजकुमार पटेल व त्यांच्या प्रहार पक्ष हा सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आहे. त्यामुळे मेळघाटात शिवसेनेला मोठा जबर धक्का बसला आहे. या धक्क्यातून माजी मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची मूळ शिवसेना स्वत: कशी सावरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्र्यांकडुन मेळघाटची दखल : राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचडोंगरी प्रकरणात थेट मेळघाटची दखल घेतल्या प्रकरणी, शैलेश मालवीय यांनी मेळघाटवासियां तर्फे आभार व्यक्त केले. भविष्यात सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने नागरिकांची व मेळघाटाची समस्या सोडविणार असल्याचे सांगितले जाते. आपल्या परीने मेळघाट ची समस्या मुख्यमंत्री पुढे मांडून त्या सोडवण्याच्या आपण प्रयत्न करणार अशी ग्वाही मालवीय यांनी दिली.

हेही वाचा : बाळासाहेब तुमची प्रॉपर्टी नाही, ते शिवसैनिकांचे दैवत; आमदार शिरसाठ यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.