अमरावती - जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाच्या पाणी सोडण्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये वातावरण तापले आहे. भाजपने तिवसा मतदारसंघात पाणी सोडण्याच्या श्रेयावरून आडकाठी टाकली, असा आरोप काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केला होता.
काँग्रेस पक्षाच्या आमदार यशोमती ठाकूर यांना श्रेय जाऊ नये म्हणून मोर्शी वरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार अनिल बोंडे यांच्या सह भाजप पदाधिकाऱ्यांनी राजकीय दबाव प्रशासकीय अधिकाऱ्यावर आणला आणि अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्याला स्थगिती दिली, असा आरोप काँग्रेसने केला.
काँग्रेसच्या आक्रमक आंदोलनापुढे प्रशासन आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी नमती बाजू घेत यशोमती ठाकूर यांच्यासह आमदार विरेंद्र जगताप, रणजित कांबळे, विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या आंदोलनानंतर अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोमवारी ५ वाजता सायंकाळी सोडण्यात आले आहे. यासाठी धरणाचे २ दरवाजे उघडण्यात आले आहेत.