अमरावती : पतीच्या निधनानंतर कोसळलेल्या प्रचंड मोठा दुःखाचा डोंगर सर करण्याचा प्रयत्न करीत शिवानी चक्रवर्ती करत आहेत. केवळ पुरुषच करू शकतात असा गैरसमज असणाऱ्या सायकल, दुचाकी वाहन यांचे टायर पंचर दुरुस्तीचे काम करून आपल्या दोन मुलींचे भविष्य घडविण्यासाठी झटत आहेत. रस्त्यावर पंचर दुरुस्त करणारी महिला ( woman fixing a puncture on the road ) म्हणून त्यांच्याकडे सुरुवातीला आश्चर्याने पाहणारे अमरावतीकर आज वेगळं काम करणारी आदर्श महिला ( Amravati Navdurga ) म्हणून आदर करीत आहेत.
सुरुवात कठीण, जिद्द कायम : मूळचा रायपूर येथील रहिवासी असणाऱ्या शिवानी चक्रवर्ती यांचे 2000 मध्ये गोविंद चक्रवर्ती यांच्यासोबत लग्न झाल्यावर त्या रायपूर वरून अमरावतीला आल्या. सुरुवातीची काही वर्ष गोविंद चक्रवर्ती हे मजुरीचे काम करत होते. 2008 मध्ये त्यांनी रुक्मिणी नगर परिसरात टायर पंचर दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले. 2018 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे गोविंद चक्रवर्ती यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी शिवानी चक्रवर्ती सह मोसमी आणि शिखा त्या दोन चिमुकल्या होत्या. किरण नगर परिसरात भाड्याच्या घरात राहणार्या शिवानी चक्रवर्ती यांचे अमरावतीत कोणी नातेवाईक नाही. कोणाचा आधार नाही अशा परिस्थितीत शिवानी चक्रवर्ती यांनी आपल्या पतीचे काम आपण करायचे असे ठरविले.
सायकल दुरुस्तीचे काम घेतले शिकून : पंचर दुरुस्तीचे कुठलेही ज्ञान नसताना एक कारागीर त्यांनी ठेवला. विशेष म्हणजे या कारागिराकडून त्यांनी दोन महिन्यात पंचर दुरुस्तीचे काम शिकून घेतले. तीन-चार महिन्यातच हा कारागीर काम सोडून गेला. त्यानंतर पंचर दुरुस्ती करण्याची संपूर्ण जबाबदारी शिवानी चक्रवर्ती यांनी स्वीकारली.पंचायत दुरुस्ती सोबतच सायकल दुरुस्ती चे छोटे मोठे काम देखील त्या करायला लागल्या.रुक्मिणी नगर परिसरात त्या ठिकाणी पती पंचर दुरुस्तीचे काम करायचे त्याच ठिकाणी हजार रुपये, महिना असणारे छोटे दुकान त्यांनी कामाचे साहित्य ठेवण्यासाठी भाड्याने घेतले. मुंगी ज्याप्रमाणे भिंतीवर चढते व अनेकदा खाली पडते अगदी तसाच अनुभव माझा होता. इतक्या शब्दाचे त्यांनी हे काम करताना त्यांना किती कष्ट सोसावे लागले हे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना थोडक्यात स्पष्ट केले.
आजारपणामुळे दोन महिन्यांपासून काम बंद : काही महिन्यांपासून बरं नसल्यामुळे नुकतेच शिवानी चक्रवर्ती यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. आजारी असल्यामुळे पंचर दुरुस्तीचे दुकान बंद आहे. आता आठ पंधरा दिवसानंतर पुन्हा नव्या जोमाने काम सुरू करणार असे शिवानी चक्रवर्ती म्हणाल्या.पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाला असणारी मोठी मुलगी देखील प्रायव्हेट जॉब करायला लागली. लहान मुलगी दहाव्या इयत्तेत आहे. आजवर जो काही अनुभव आला तो पाहता मी खरणार नाही मुलींचे भविष्य चांगले व्हावे यासाठी मी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागणार असा विश्वास देखील शिवानी चक्रवर्ती यांनी व्यक्त केला. यांनी व्यक्त केला.