ETV Bharat / city

Amravati Chemist Murder : उमेश कोल्हे हत्या प्रकरण; सातव्या आरोपीला नागपुरमधून अटक - नुपूर शर्मा अमरावती मराठी बातमी

उमेश कोल्हे यांची काही दिवासांपूर्वी हत्या करण्यात ( Amravati Chemist Murder ) आली होता. नुपूर शर्मांबाबात केलेल्या पोस्टमुळेच उमेश कोल्हेंची हत्या करण्यात ( Umesh Kolhe Murder Case Due Post About Nupur Sharma ) आल्याचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी स्पष्ट केलं आहे.

vikram sali umesh kolhe
vikram sali umesh kolhe
author img

By

Published : Jul 2, 2022, 4:03 PM IST

Updated : Jul 2, 2022, 10:48 PM IST

अमरावती - अमरावतीतील 55 वर्षांच्या मेडिकल चालकाची हत्या करण्यात आली ( Amravati Chemist Murder ) होती. उमेश कोल्हे असे या मेडिकल चालकाचे नाव आहे. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यानं ही हत्या केल्याचा आरोप भाजपनं केला आहे. त्यानंतर आता याप्रकरणाबाबात पोलीस उपायुक्तांनी मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उमेश कोल्हे यांची हत्या ( Umesh Kolhe Murder Case ) नुपूर शर्मांबाबात समाज माध्ममावर केलेल्या पोस्टमुळेच करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी स्पष्ट केलं ( Umesh Kolhe Murder Case Due Post About Nupur Sharma ) आहे. तसेच, उमेश कोल्हे प्रकरणाचा तपास अमरावती पोलिसच करत असल्याचेही साळी ( DCP Vikram Sali ) यांनी सांगितलं आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  • Umesh Kolhe murder case | Amravati: Police have arrested the seventh accused related to the murder incident from Nagpur, Maharashtra: Nilima Araj, Police Inspector, City Kotwali PS, Amravati

    — ANI (@ANI) July 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शहरातील उमेश कोल्हे ( रा. घनश्यामनगर ) या मेडिकल व्यावसायिकाची चाकून गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. 21 जून रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. त्याप्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. 'अटक केलेल्या आरोपींकडे हत्येचा हेतू स्पष्ट करण्याच्या अनुषंगाने सर्व शक्यता गृहीत धरून पोलीस तपास करीत आहे. उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमांवर पोस्ट केली होती. त्या अनुषंगाने तपास केल्यानंतर ही हत्या या प्रकाराचीच संबंधित असल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झाले,' असे उपायुक्त साळी यांनी म्हटलं आहे.

सातव्या आरोपीला नागपूरमधून अटक - उमेश कोल्हे हत्या प्रकरणात अमरावती पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. शेख इरफान शेख रहीम असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण सात आरोपींना अटक केली आहे. नुपूर शर्मा प्रकरणात सोशल मीडियावर उमेश कोल्हे यांनी पोस्ट शेअर केल्यामुळे त्यांची हत्या झाली असल्याचे अमरावती पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी कालपर्यंत एकूण सहा जणांना अटक केली होती. आज या प्रकरणात सातव्या आरोपीला नागपूर येथून अटक केली आहे.

काय आहे प्रकरण? - शहरातील उमेश कोल्हे ( रा. घनश्यामनगर ) या मेडिकल व्यावसायिकाची चाकून गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. 21 जून रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. कोल्हे यांचे तहसील कार्यालय परिसरात मेडिकल स्टोअर्स आहे. मंगळवारी रात्री त्यांनी मेडिकल स्टोअर्स बंद केले. त्यानंतर ते मुलगा संकेत (२७) व सून वैष्णवी यांच्यासोबत घरी जायला निघाले. समोर एका दुचाकीवर उमेश तर मागे दुसऱ्या दुचाकीवर मुलगा संकेत व त्यांची पत्नी वैष्णवी जात होते. न्यू हायस्कूल मेन समोरील गल्लीतून जात असताना एका दुचाकीजवळ तीन जण उभे होते. त्यातील एकाच्या हातात चाकू होता. ते तिघेही अचानक उमेश यांच्या दुचाकीच्या आडवे झाले.

डॉक्टर युनूस खान बहादूर खानला चार दिवसांची पोलीस कोठडी - अमरावती शहरातील औषधी विक्रेता उमेश कोल्हे हत्या प्रकरणात ( Drug Dealer Umesh Kolhe Murder Case ) पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केलेला डॉ. युसुफ खान याला जिल्हा व सत्र न्यायालयाने 6 जुलै पर्यंत पोलीस कोठडी ( Yusuf Khan To Police Custody ) सुनावली आहे. या प्रकरणात अन्य एक आरोपी अतीब रशीद आदिल रशीद याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली आहे.

तिघांपैकी एकाने केला गळ्यावर वार - त्यामुळे उमेश यांनी दुचाकी थांबविली. यावेळी काही कळण्याआधीच तिघांपैकी एकाने चाकूने उमेश यांच्या गळ्यावर वार केला तर ईतरांनीही मारहान करण्यास मदत केली. त्यामुळे उमेश हे दुचाकीसह खाली कोसळले. हा प्रकार त्यांच्या मागे येत असलेल्या मुलगा संकेत व सून वैष्णवी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दुचाकी थांबवून आरडाओरड केली. त्यामुळे तिनही मारेकरी दुचाकीने तेथून पळून गेले. त्यानंतर संकेत व वैष्णवी यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने उमेश यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान काही वेळातच उमेश यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना देण्यात आली.

सहा जणांना अटक - या प्रकरणी पोलिसांनी अतिफ राशीद आदिल रशीद ( वय, २४ रा. मौलाना आझाद कॉलनी), मुदस्सीर अहेमद शेख इब्राहिम ( वय २२, रा. बिसमिल्लानगर ), शाहरूख पठाण हिदायत खान ( वय२४, रा. सुफियाननगर), अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तसलिम ( वय, २४ रा. बिसमिल्लानगर ) आणि शोएब खान उर्फ भुऱ्या वल्द साबीर खान (वय २२, रा. यास्मीननगर ), युसूफ खान बहादूर खान (44) आणि शेख इरफान शेख रहीन ( वय, 35 ) असं अटक केलेल्या सात व्यक्तींच नावं आहे.

उमेश कोल्हे याचं बंधू महेश कोल्हे यांनी याबाबत एएनआयशी बोलताना म्हणाले, त्यांना कधी धमकी मिळाल्याची माहिती उमेश कोल्हे यांनी दिली नाही. मोबाईल त्यांचा पोलिसांच्या जवळ असल्याने आम्हाला त्याबाबत काही माहिती नाही. आमचा कोणावर संशय नाही आहे. सुरुवातीला पोलीस तपासात 2 ते 4 लोकांना अटक केल्याचं सांगितले जातं होतं. स्थानिक वृत्तपत्रामध्ये लुटमारीच्या घटनबद्दल छापून येतं होते. मात्र, असे काहीच झाले नव्हते. आरोपी आले आणि चाकू खुपसून गेले, असेही महेश कोल्हे यांनी म्हटलं आहे.

  • #WATCH | He didn't receive threats from anyone... We were told that during primary investigation, 2-4 people were arrested but some newspapers, without proper investigation started publishing that he was killed because of loot/robbery, but nothing as such happened: Mahesh Kolhe pic.twitter.com/bXh38FfNYR

हेही वाचा - Amravati Chemist Murder : उमेश कोल्हे प्रकरणाची गृहमंत्रालयाकडून दखल; तपास एनआयएकडे वर्ग

Last Updated : Jul 2, 2022, 10:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.