ETV Bharat / city

Devendra Fadnavis In Amravati : हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीस अमरावतीत दाखल; भाजपा नेत्यांसोबत बैठक सुरू - अमरावती हिंसाचार

हिंसाचारानंतर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आज अमरावती शहरात येणार आहेत. यावेळी ते दंगल झालेल्या भागांची पाहणी करणार असून भाजपाच्या जखमी कार्यकर्त्यांचीदेखील ते भेट घेणार आहेत.

Devendra Fadnavis In Amravati
Devendra Fadnavis In Amravati
author img

By

Published : Nov 21, 2021, 7:00 AM IST

Updated : Nov 21, 2021, 11:36 AM IST

अमरावती - आठवड्यापूर्वी झालेल्या हिंसाचारानंतर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज अमरावती शहरात (Amravati City) दाखल झाले आहेत. यावेळी ते दंगल झालेल्या भागांची पाहणी करणार असून भाजपाच्या जखमी कार्यकर्त्यांचीदेखील ते भेट घेणार आहेत. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास पत्रकारांशी ते संवाद साधतील.

फडणविसांचा दौरा महत्त्वाचा -

अमरावतीत दाखल झाल्यानंतर त्यांनी विश्रामगृहात भाजपा नेत्यांची बैठकीत घेतली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, माजी कृषी मंत्री अनिल बोंडे, भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, महापौर चेतन गांवडेसह भाजप नेते उपस्थित आहेत. तसेच खासदार नवनीत राणा देखील या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस हे मसानगंज, हनुमाननगर, पठवा चौक या भागात पाहणी करणार आहेत. तसेच घटनेत जखमी झालेल्या कार्यकर्त्यांची भेट घेणार आहे. दंगलीनंतर (Amravati violence) आता राजकिय नेत्यांच्या भेटीगाठी शहरात सुरू झाल्या असून देवेंद्र फडणवीस यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

किरीट सोमैयांना नाकारली होती परवानगी -

हिंसाचारानंतर भाजप नेते किरीट सोमैया हे देखील १७ तारखेला अमरावतीमध्ये येणार होते. परंतु त्यांच्या दौऱ्याला पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी विरोध केला होता. अमरावती शांत झाल्यावर सोमैयांनी अमरावतीत यावे, असा सल्ला मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला होता.

हेही वाचा - Amravati Internet Service : सहा दिवसानंतर अमरावती शहरातील इंटरनेट सेवा पूर्ववत

Last Updated : Nov 21, 2021, 11:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.