ETV Bharat / business

Cow Dung For CNG Cars : काय सांगताय काय! आता चक्क गायीच्या शेणावर चालणार कार!

सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने लवकरच शेणावर चालणाऱ्या सीएनजी कार बाजारात आणणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने भारत सरकारच्या एजन्सी आणि आशियातील सर्वात मोठ्या दुग्ध उत्पादक कंपनीशी करार केला आहे.

Cow Dung For CNG Cars
शेणावर चालणाऱ्या सीएनजी कार
author img

By

Published : Jan 28, 2023, 2:05 PM IST

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने आपल्या CNG कारमध्ये शेणाचा वापर करणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी मारुती सुझुकीने भारत सरकारची एजन्सी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आणि आशियातील सर्वात मोठी दुग्ध उत्पादक कंपनी बनस डेअरी यांच्याशी सामंजस्य करार केला आहे.

बायोगॅसने वीज निर्मिती : कंपनीने 2030 च्या वाढीच्या धोरणात म्हटले आहे की, त्यांनी 'फुजीसान असागिरी बायोमास' मध्ये देखील गुंतवणूक केली आहे. ही जपानीज कंपनी शेणापासून मिळालेल्या बायोगॅसचा वापर करून वीज निर्माण करते. सुझुकी मोटार कॉर्पोरेशनने सांगितले की, उत्पादनांमधून CO2 उत्सर्जन कमी झाल्यामुळे एकूण CO2 (कार्बन डायऑक्साइड) उत्सर्जनात होणारी वाढ नाकारली जाणार नाही, अशी आमची अपेक्षा आहे. विक्री युनिट्स वाढवणे आणि एकूण CO2 उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे यामधील समतोल राखण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे.

सीएनजी मार्केट मध्ये 70 टक्के वाटा : हे आव्हान पेलण्यासाठी बायोगॅस व्यवसाय हा सुझुकीचा अनोखा उपक्रम आहे. यामध्ये शेणापासून मिळणारा बायोगॅस तयार करून त्याचा पुरवठा केला जाईल. जे डेअरी वेस्ट आहेत, जे प्रामुख्याने भारताच्या ग्रामीण भागात दिसून येतात. हा बायोगॅस सुझुकीच्या सीएनजी मॉडेलसाठी वापरता येईल, असे कंपनीने म्हटले आहे. याचा भारतातील सीएनजी कार बाजारपेठेतील वाटा सुमारे 70 टक्के आहे. कंपनीने सांगितले की, 'भारतातील बायोगॅस व्यवसाय केवळ कार्बन न्यूट्रॅलिटीलाच हातभार लावत नाही, तर आर्थिक वाढीलाही चालना देतो. आम्ही भविष्यात आफ्रिका, आशिया आणि जपानसह इतर कृषी क्षेत्रांमध्ये व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत आहोत.'

आघाडीची कंपनी : सुझुकी ही भारतातील ऑटोमोबाईल बाजारपेठेतील आघाडीची कंपनी आहे, जी कार्बन न्यूट्रॅलिटी आणि उदयोन्मुख देशांच्या आर्थिक विकासात योगदान देते. पॅरिस करारानुसार, CO2 उत्सर्जन कमी करण्यासाठी विकसित देश आणि उदयोन्मुख देश यांच्यात समन्वय आवश्यक आहे. कंपनीने म्हटले आहे की ती जगभरातील आपल्या भागधारकांना योगदान देऊ शकते असा विश्वास आहे. सुझुकी मुख्यालय, योकोहामा लॅब, सुझुकी आर अँड डी सेंटर इंडिया आणि मारुती सुझुकी भविष्यातील तंत्रज्ञान, प्रगत तंत्रज्ञान आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन तंत्रांसाठी प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी सामायिक करून कार्यक्षम विकासासाठी सहयोग करतील.

भविष्यातील योजना : कंपनीने असेही म्हटले आहे की ती दोन ट्रिलियन येन संशोधन आणि विकास कामाच्या खर्चासाठी आणि 2.5 ट्रिलियन येन भांडवली खर्चात गुंतवेल. जे आर्थिक वर्ष 2030 (2029-30) पर्यंत एकूण 4.5 ट्रिलियन येन आहे. त्यात म्हटले आहे की 4.5 ट्रिलियन येन पैकी 2 ट्रिलियन येन ही विद्युतीकरणाशी संबंधित गुंतवणूक असेल. त्यापैकी 500 अब्ज येन ही बॅटरीशी संबंधित गुंतवणूक असेल.

हेही वाचा : How To Use Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताना घ्या 'अशी' काळजी नाहीतर व्हाल कर्जबाजारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.