ETV Bharat / business

International IP Index : आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांकात भारत 42 व्या स्थानी - आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक

यूएस चेंबर्स ऑफ कॉमर्स दरवर्षी आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक डेटा जारी करते. या निर्देशांकात 55 प्रमुख जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये भारत 42 व्या क्रमांकावर आहे. यूएस चेंबर ऑफ कॉमर्सच्या ग्लोबल इनोव्हेशन पॉलिसी सेंटरचे वरिष्ठ उपाध्यक्ष पॅट्रिक किलब्राइड यांनी शुक्रवारी सांगितले की, काही गंभीर प्रश्न असूनही भारताचे प्रयत्न वाखण्याजोगे आहेत.

International IP Index
आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक
author img

By

Published : Feb 25, 2023, 2:30 PM IST

वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांकाशी संबंधित नवीन आकडे समोर आले आहेत. यूएस चेंबर्स ऑफ कॉमर्सने जाहीर केलेल्या या आकडेवारी नुसार 55 प्रमुख जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये भारत 42 व्या क्रमांकावर आहे. इंटरनॅशनल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडेक्सनुसार, इनोवेशनच्या माध्यमातून आपल्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या बाजारपेठांमध्ये भारत एक प्रमुख बाजारपेठ बनू शकतो. अहवालात असे म्हटले आहे की, अलीकडच्या काळात जागतिक स्तरावर भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार आणि प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यूएस चेंबर ऑफ कॉमर्सच्या ग्लोबल इनोव्हेशन पॉलिसी सेंटरचे वरिष्ठ उपाध्यक्ष पॅट्रिक किलब्राइड यांनी शुक्रवारी हा वार्षिक अहवाल प्रकाशित केला आहे.

भारताचे पायरसी रोखण्यासाठी सतत प्रयत्न : या अहवालात पेटंट आणि कॉपीराइट कायद्यांपासून ते IP मालमत्तेची कमाई करण्याची क्षमता आणि आंतरराष्ट्रीय करारांसाठी समर्थन या सर्व गोष्टींच्या आधारे देशांची यादी तयार केली आहे. अहवालात असे म्हटले आहे की, भारताने डायनॅमिक मनाई आदेश जारी करून कॉपीराइट पायरसी रोखण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. भारतात उदारमतवादी संशोधन आणि विकासाच्या माध्यमातून बौद्धिक संपदेची चोरी थांबवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. या सोबतच चोरी आणि बनावटगिरीच्या नकारात्मक परिणामांबाबत जनजागृती करण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचे अहवालात म्हटले आहे.

कॉपीराइटच्या विरोधात ठोस पावले उचलले : अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, एसएमई साठी बौद्धिक संपदेचे निर्माण आणि वापरासाठी प्रशासकीय प्रोत्साहन देणाऱ्या देशांमध्ये भारत जागतिक नेता म्हणून उदयास आला आहे. अहवालात असे म्हटले आहे की, भारताने कॉपीराइट उल्लंघन करणाऱ्या सामग्रीच्या विरोधात ठोस पावले उचलली आहेत. बौद्धिक मालमत्तेची चांगली समज आणि वापर वाढविण्यासाठी एक उत्कृष्ट श्रेणी फ्रेमवर्क तयार केले गेले आहे. तथापि, भारताला त्याच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी फ्रेमवर्कमधील दीर्घकालीन त्रुटी दूर करण्यासाठी आणि क्षेत्रासाठी एक नवीन मॉडेल तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण व सतत प्रयत्न करावे लागतील.

बौद्धिक संपदा निर्देशांकाचे उद्दिष्ट : अहवालात असे म्हटले आहे की, 2021 मध्ये बौद्धिक संपदा अपील मंडळाचे विसर्जन भारतातील बौद्धिक संपदा अधिकारांच्या अंमलबजावणीबद्दल गंभीर चिंता निर्माण करते. आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांकाचे उद्दिष्ट जागतिक बाजारपेठेतील बौद्धिक संपदा लँडस्केपचे विश्लेषण करणे आहे. याद्वारे अधिक नावीन्यपूर्णता, सर्जनशीलता आणि स्पर्धात्मकतेने उज्ज्वल आर्थिक भविष्याकडे नेव्हिगेट करण्यात राष्ट्रांना मदत करता येऊ शकते. एका दशकाच्या स्थिर व वाढीव जागतिक बौद्धिक संपदा प्रणाली सुधारणांनंतर, बहुपक्षीय संस्थांसह यूएस आणि आंतरराष्ट्रीय नेत्यांच्या विचाराधीन प्रस्तावांच्या गर्दीत मोठ्या प्रयासाने मिळवलेल्या आर्थिक नफ्यांशी तडजोड करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे, असे एका प्रकाशनात म्हटले आहे.

हेही वाचा : Pakistan Economic Crisis: पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, काश्मिरी नेते आणि कार्यकर्ते झाले सैरभैर, वाचा स्पेशल रिपोर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.