हैदराबाद Dhantrayodashi 2023 : सणासुदीच्या काळात सर्वच ब्रँड आणि कंपन्या ग्राहकांना विविध सवलती देतात. यंदाच्या दिवाळीतही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनं-चांदी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. सोन्या-चांदीकडे लोकांचा हा कल लक्षात घेऊन अनेक ज्वेलरी ब्रँड्सकडून मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे.
या यादीत तनिष्क आणि कल्याण ज्वेलर्स आघाडीवर आहेत. त्याचबरोबर मलबार गोल्ड अँड डायमंड्स, कॅरेट लेन, जॉयलुक्कास यांच्याकडून देखील ग्राहकांना विशेष सवलतीच्या ऑफर दिल्या जात आहेत. चला तर मग जाणून घेऊया या ब्रँड्सनी ग्राहकांना कोणत्या ऑफर दिल्या आहेत आणि कोणाकडून किती सूट दिली जात आहे.
१) कल्याण ज्वेलर्स : कल्याण ज्वेलर्स कॅन्डेरे डायमंड स्टोनच्या किमतींवर २० टक्के सवलत देत आहे. त्यांनी सर्व प्रमुख बँकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर ३ टक्के सूट जाहीर केली आहे. यासोबतच कल्याण ज्वेलर्सतर्फे ग्राहकांना दिवाळीनिमित्त गिफ्ट हॅम्परही देण्यात येणार आहे.
२) तनिष्क : धनत्रयोदशीच्या पर्वावर तनिष्क सोनं, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग शुल्कावर २० टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. तसंच, तनिष्कनं कोणत्याही ज्वेलर्सकडून खरेदी केलेल्या जुन्या सोन्यावर १०० टक्के विनिमय मूल्य जाहीर केलंय. म्हणजे, जर तुम्हाला जुन्या सोन्याच्या बदल्यात नवीन सोनं घ्यायचं असेल, तर तनिष्क हे तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. त्याचवेळी, कंपनी SBI कार्डधारकांना किमान ८०,००० रुपयांच्या खरेदीवर ४,००० रुपयांची इंस्टंट सूट देत आहे. हे प्रति कार्ड एका व्यवहारावर १२ नोव्हेंबरपर्यंत वैध आहे.
३) मलबार गोल्ड आणि डायमंड्स : मलबार गोल्ड धनत्रयोदशीनिमित्त ग्राहकांना १०० मिलीग्राम सोन्याचं नाणं भेट देत आहे. कंपनी सोन्याच्या दागिन्यांवर प्रत्येक ३०,००० रुपयांच्या खरेदीवर १०० मिलीग्राम सोन्याचं नाणं देत आहे. तसंच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग शुल्कावर ३० टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. या ऑफरची अंतिम मुदत १९ नोव्हेंबरपर्यंत आहे. जर तुम्ही SBI कार्डधारक असाल तर कंपनी तुम्हाला २५,००० रुपयांच्या किमान व्यवहारावर ५ टक्के अतिरिक्त कॅशबॅक देईल. याचाच अर्थ कंपनी किमान २५,००० रुपयांच्या खरेदीवर २,५००० रुपयांचा कॅशबॅक देत आहे. ही ऑफर १२ नोव्हेंबरपर्यंत वैध असेल.
४) मेलोरा : मेलोरा कंपनी सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर २५ टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. त्याचबरोबर डायमंड उत्पादनांच्या किमतीवरही ४० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. ब्रँड ICICI बँक, RBL बँक, येस बँक आणि OneCard च्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदीवर ७.५ टक्क्यांची इंस्टंट सूट देत आहे.
५) जॉयलुक्कास : जॉयलुक्कास कंपनी हिऱ्यांच्या खरेदीवर २५ टक्के सवलत देत आहे. तर कॅरेट लेन वर ४,००० रुपये आणि त्याहून अधिक किमतीच्या हिऱ्यांच्या खरेदीवर २५ टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. त्याच वेळी, SBI कार्ड वापरणाऱ्यांसाठी ५ टक्क्यांपर्यंत इंस्टंट सूट देखील उपलब्ध आहे. ही ऑफर १२ नोव्हेंबरपर्यंत वैध असेल.
हेही वाचा :