नवी दिल्ली - गेल्या दोन दिवसांत चांदीचे दर प्रति किलो ३ हजार रुपयांनी वाढले आहे. मागणी वाढत असल्याने चांदीचे दर वाढले आहेत.
चांदीचे दर सोमवारी प्रति किलो ९३६ रुपयांनी वाढले होते. तर चांदीचे दर मंगळवारी प्रति किलो २,०२१ रुपयांनी वाढले आहेत. चांदीचे दर दोन दिवसांत एकूण २,९५७ रुपयांनी वाढले आहेत. चांदीचा दर आज प्रति किलो ७३,१२२ रुपये आहे.
हेही वाचा-मुंबई शेअर बाजाराने ओलांडला पुन्हा ५०,००० चा टप्पा!
अशी आहे बाजारातील स्थिती
- चांदीप्रमाणे सोन्याचे दरही वाढले आहेत. सोन्याचे दर प्रति तोळा ३३३ रुपयांनी वाढून ४७,८३३ रुपये आहेत. सोमवारी सोन्याचा दर प्रति तोळा ३४८ रुपयांनी वाढले होते.
- आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वधारून प्रति औंस १,८६९ डॉलर आहेत. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस २८.४८ डॉलर आहेत.
- एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल म्हणाले, की डॉलरचे मूल्य कमी होत असल्याने सोन्याचे दर वाढले आहेत.
- मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी म्हणाले, की सोन्याचे दर वाढून १,८५० डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे.
- सलग तिसऱ्या सत्रात रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत वाढले आहे. रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत १७ पैशांनी वधारून ७३.०५ रुपये आहे.
हेही वाचा-एलॉन मस्क असल्याचे भासवित क्रिप्टोकरन्सीमध्ये २ दशलक्ष डॉलरची फसवणूक