ETV Bharat / business

अमेरिका-चीन व्यापारी तणावाचे पडसाद ; शेअर बाजाराचा निर्देशांक ४८८ अंशाने गडगडला - Reliance industries

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क वाढविण्याची चीनला रविवारी धमकी दिली. त्यानंतर दोन्ही महाशक्ती असलेल्या देशांमध्ये व्यापारी तणाव निर्माण झाले आहेत. याचा परिणाम म्हणून जगभरातील गुंतवणुकदारांची चिंता वाढली आहे.

शेअर बाजार
author img

By

Published : May 8, 2019, 6:11 PM IST

मुंबई - शेअर बाजाराची पडझड सलग सहाव्या सत्रात सुरुच राहिली आहे. अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारी तणावाची स्थिती आहे. याचा परिणाम म्हणून विदेशी गुंतवणुकदरांच्या गुंतवणुकीचा ओघ कमी झाल्याचे दिसून आले. शेअर बाजार ४८८ अंशाने गडगडून ३७,७८९.१३ वर बंद झाला. निफ्टीच्या निर्देशांकातही १३९ अंशाची घसरण झाली. शेअर बाजार बंद होताना निफ्टी ११,३५९.४५ वर पोहोचला.

निर्देशांकात घसरण झाल्याने सर्वात अधिक फटका रिलायन्स इंडस्ट्रीजला बसला आहे. रिलायन्सच्या शेअरमध्ये ३.३५ टक्के घसरण झाली. त्यानंतर बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, एसबीआय आणि वेदांता या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. एशियन पेंट्स, एचसीएल टेक आणि टीसीएस या कंपन्यांचे शेअर केवळ वधारले आहेत.

जगभरातील गुंतवणुकदारांची वाढली चिंता-

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क वाढविण्याची चीनला रविवारी धमकी दिली. त्यानंतर दोन्ही महाशक्ती असलेल्या देशांमध्ये व्यापारी तणाव निर्माण झाले आहेत. याचा परिणाम म्हणून जगभरातील गुंतवणुकदारांची चिंता वाढली आहे. अमेरिका आणि चीनमधील व्यापारी युद्ध असताना त्यांच्यात आर्थिक करार झाला नाही. त्याचा परिणाम येत्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेवर होईल, अशी भीती बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुका पार पडत असल्यानेही गुंतवणुकदारांनी काहीसा सावध पवित्रा घेतल्याचे शेअर खानचे मुख्य सल्लागार हेमांग जानी यांनी सांगितले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.