मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात ४०० अंशाने वधारला आहे. बँकिंगचे वधारलेले शेअर आणि जागतिक आर्थिक मंचावरील सकारात्मक स्थितीमुळे निर्देशांक वधारला आहे.
शेअर बाजार निर्देशांक ३८४.५४ अंशाने वधारून ३९,००८.८३ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक हा १२०.७५ अंशाने वधारून ११,५६०.९५ वर पोहोचला.
हेही वाचा-शाओमीचा ५ हजार एमएएच बॅटरी क्षमतेचा रेडमी ८ ए लाँच; जाणून घ्या, स्मार्टफोनची किंमत
या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले
आयसीआयसीआय बँक, इंडुसलँड बँक, कोटक बँक, एल अँड टी, एम अँड एम, बजाज फायनान्स, ओएनजीसी, टाटा स्टील, मारुती, भारती एअरटेल, टेक महिंद्रा आणि एशियन पेंट्सचे शेअर ३ टक्क्यापर्यंत वधारले आहेत. तर येस बँक, एचसीएल टेक, एसबीआय, इन्फोसिस, एचडीएफसी, पॉवरग्रीड, आयटीसी, सनफार्मा आणि टीसीएसचे शेअर हे ३ टक्क्यापर्यंत घसरले आहेत.
हेही वाचा-भारत आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये १.३ ट्रिलियन डॉलर्सची करणार गुंतवणूक - पंतप्रधान मोदी
बुधवारी शेअर बाजार निर्देशांक ५०३.६३ अंशाने घसरून ३८,५९३.५२ वर पोहोचला होता. तर निफ्टीचा निर्देशांक १४८ अंशाने घसरून ११,४४०.२० वर पोहोचला होता.