मुंबई - केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजारातील तेजी दुसऱ्या दिवशीही शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर १,२०० वधारला आहे. तर निफ्टीने १४,६०० अंशाचा टप्पा ओलांडला आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर १,१९७.११ अंशाने वधारून ४९,७९७.७२ वर स्थिरावला आहे. निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर ३६६.६५ अंशाने वधारून १४,६४७.८५ वर स्थिरावला आहे. गेल्या दोन सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३,५११ अंशाने वधारला आहे. तर निफ्टीचा निर्देशांक १,००७.२५ अंशाने वधारला आहे.
हेही वाचा-एचडीएफसीच्या आयटी सेवांचे होणार लेखापरीक्षण-आरबीआयचा निर्णय
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर-
एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, एल अँड टी, भारती एअरटेल, मारुती सुझुकी आणि कोटक बँकेचे शेअर वधारले आहेत. शेअर बाजार बंद होताना २७ क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर वधारले आहेत.
हेही वाचा-अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात तेजी कायम; गुंतवणुकदारांच्या संपत्तीत ३ लाख कोटींची वाढ
काय आहे बाजार विश्लेषकांचे मत ?
- बहुतेक बाजार विश्लेषकांच्या माहितीनुसार केंद्रीय अर्थसंकल्पाला शेअर बाजाराने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कारण, केंद्रीय अर्थसंकल्पात कोणतेही नवीन कर वाढविण्यात आले नाहीत.
- विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी (एफआयओ) सोमवारी १,४९४.२३ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कोव्हिड कर लागू करण्यात येईल, अशी गुंतवणूकदारांना भीती वाटत होती. मात्र, हा कर लागू न झाल्याने शेअर बाजाराला दिलासा मिळाला आहे.
- सार्वजनिक बँकांसाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद आणि दोन सार्वजनिक बँकांचे खासगीकरण असे महत्त्वाचे निर्णय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले. यामधून केंद्र सरकारने मालमत्तेचे रोखीकरण केल्याचे बाजार विश्लेषकांचे मत आहे.
- केंद्रीय अर्थसंकल्प हा प्रागतिक, धाडसी आणि दूरदृष्टी ठेवून सादर केल्याचे शेअर बाजार विश्लेषकांनी म्हटले आहे.
दरम्यान, फॉरेक्स मार्केटमध्ये रुपयाचे मूल्य हे डॉलरच्या तुलनेत ६ पैशांनी वधारून एका डॉलरसाठी ७२.९६ रुपये आहे.