मुंबई - शेअर बाजार निर्देशांक १६७ अंशाने घसरून बंद झाला. धातू व ऑटो कंपन्यांच्या शेअरला घसरणीचा फटका बसला. अमेरिकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याने शेअर बाजारात घसरण झाली आहे.
शेअर बाजार निर्देशांक १६७.१७ अंशाने घसरून ३८,८२२.५७ वर पोहोचला. निफ्टी निर्देशांक ५८.८० अंशाने घसरून ११,५१२.४० वर पोहोचला.
हेही वाचा-खूशखबर! 'या' कारची किंमत तब्बल १ लाख रुपयाने स्वस्त
या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले
वेदांत, इंडसइंड बँक, येस बँक, टाटा स्टील, ओएनजीसी, टाटा मोटर्स, सन फार्मा, एम अँड एम, टीसीएस आणि हिरो मोटोकॉर्पचे शेअर हे ५.३९ टक्क्यापर्यंत घसरले आहेत. बजाज फायनान्स, भारती एअरटेल, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक बँक आणि एनटीपीसीचे शेअर हे १.६१ टक्क्यापर्यंत वधारले आहेत.
हेही वाचा-पीएमसी को-ओपरेटिव्ह बँक प्रकरणाबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 'हे' दिले उत्तर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची महाभियोग प्रक्रियेसाठी चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे अमेरिकेत राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत. अमेरिका-चीनमधील व्यापारी युद्धही निवळण्याची शक्यता धूसर झाली आहे.
हेही वाचा-भांडवली खर्चाचा सीतारामन घेणार आढावा; वित्तीय सल्लागारांसह सचिवांची दिल्लीत बैठक