ETV Bharat / business

रुपयाची डॉलरच्या तुलनेत ५० पैशांनी घसरण; सोने प्रति तोळा ३९१ रुपयांनी महाग

सलग दुसऱ्या सत्रात रुपयाची घसरण झाली आहे. दोन्ही सत्रात एकूण ११३ पैशांनी रुपयाची घसरण झाली आहे. दिवसभरात रुपयाचे मूल्य हे अस्थिर राहिल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे प्रमुख व्ही. के. शर्मा यांनीसांगितले.

Gold and Rupee value
सोने व रुपया मूल्य
author img

By

Published : Mar 2, 2020, 8:21 PM IST

मुंबई - रुपया सकाळच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत वधारल्यानंतर दिवसाखेर ५० पैशांनी घसरला आहे. रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत ७२.७४ वर पोहोचले आहे. कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्यानंतर रुपयाची घसरण झाली आहे. सोन्याचा दर प्रति तोळा ३९१ रुपयांनी वधारून ४२,६१६ रुपये झाला आहे.

सलग दुसऱ्या सत्रात रुपयाची घसरण झाली आहे. दोन्ही सत्रात एकूण ११३ पैशांनी रुपयाची घसरण झाली आहे. दिवसभरात रुपयाचे मूल्य हे अस्थिर राहिल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे प्रमुख व्ही. के. शर्मा यांनी सांगितले. आशियामध्ये फक्त भारतीय चलनाचीच घसरण झाल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा-वधारलेला मुंबई शेअर बाजार निर्देशांक सायंकाळी आपटला; कोरोनाचा परिणाम

सोने महागले-

सोन्याचा दर प्रति तोळा ३९१ रुपयांनी वधारून ४२,६१६ रुपये झाला आहे. चांदीची किंमत प्रति किलो ७१३ रुपयांनी वधारून ४६,२१३ रुपये झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस १,६०४ डॉलरने वधारली आहे. तर चांदीची किंमत प्रति औंस १७ डॉलरने वधारली आहे.

हेही वाचा-कोरोनाने कुक्कुटपालन क्षेत्राचे मोडले कंबरडे; पॅकेजची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.