ETV Bharat / business

आठवडभरात रुपयाची डॉलरच्या तुलनेत ५६ पैशांनी घसरण - US dollar

इंटरबँक फॉरेन एक्सचेंज मार्केट खुले होताना डॉलरच्या तुलनेत रुपया घसरून ७१.९० वर पोहोचला होता. तर बाजार बंद होताना रुपया ७२.२४ वर स्थिरावला होता. ही गेल्या सहा महिन्यातील रुपयाची सर्वात मोठी घसरण आहे.

Rupee & Dollar
रुपया व डॉलर
author img

By

Published : Feb 29, 2020, 3:28 PM IST

मुंबई - रुपयाची डॉलरच्या तुलनेत ६३ पैशांनी शुक्रवारी घसरण झाली आहे. या घसरणीनंतर रुपया ७२.२४ वर पोहोचला आहे. हे गेल्या सहा महिन्यातील सर्वाधिक अवमूल्यन आहे. तर आठवडाभरात रुपया डॉलरच्या तुलनेत ५६ पैशांनी घसरला आहे.

इंटरबँक फॉरेन एक्सचेंज मार्केट खुले होताना डॉलरच्या तुलनेत रुपया घसरून ७१.९० वर पोहोचला होता. तर बाजार बंद होताना रुपया ७२.२४ वर स्थिरावला होता. ही गेल्या सहा महिन्यातील रुपयाची सर्वात मोठी घसरण आहे.

इमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य संशोधक राहुल गुप्ता म्हणाले, चीनमधून कोरोना जगभरात पसरत असल्याने बाजाराची चिंता वाढली आहे. तसेच जागतिक मंदी येण्याची शक्यता असल्याने जोखीम वाढली आहे. कोरोनाचा विविध व्यवसायांवर परिणाम होत आहे.

हेही वाचा-अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष करून सरकारचे सामाजिक आणि राजकीय मोहिमेकडे लक्ष केंद्रित'

दरम्यान, सलग सहाव्या दिवशी मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी घसरण झाली आहे. शेअर बाजार निर्देशांक १,४४८ अंशांनी घसरून ३८,२९७.२९ वर स्थिरावला. गुंतवणूकदारांचे सुमारे पाच लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

हेही वाचा-चिंताजनक! केंद्र सरकारने मिळविलेल्या महसुलापैकी ८४.१ टक्के जानेवारीपर्यंत खर्च

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.