ETV Bharat / business

जळगावात पेट्रोलच्या दराने ओलांडला नव्वदीचा टप्पा; डिझेल 80.51 रुपये प्रति लिटर - जळगाव पेट्रोल दर न्यूज

अलीकडच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने महागाईत भर पडत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. जळगावात गेल्या आठ दिवसात पेट्रोलचे दर प्रति लिटर दीड रुपयांनी वाढले आहेत.

इंधन दर
इंधन दर
author img

By

Published : Dec 9, 2020, 7:41 PM IST

Updated : Dec 9, 2020, 8:23 PM IST

जळगाव- पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा भडकले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. जळगावात बुधवारी पेट्रोलचे दर 91.58 तर डिझेलचे दर 80.51 रुपये प्रति लिटर असे होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

अलीकडच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने महागाईत भर पडत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. जळगावात गेल्या आठ दिवसात पेट्रोलचे दर प्रति लिटर दीड रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे पेट्रोलच्या दरांनी नव्वदीचा टप्पा ओलांडला आहे. डिझेलचेही दर सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल शंभराच्या तर डिझेल नव्वदीच्या दिशेने वाटचाल करत आहे. इंधनाचे दर वाढल्यानंतर इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही मोठी वाढ होते. त्यामुळे महागाईचा आलेख वाढत जातो. अशा परिस्थितीत जगायचे तरी कसे? असा सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

जळगावात पेट्रोलच्या दराने ओलांडला नव्वदीचा टप्पा

हेही वाचा-पतमानांकनात सुधारणेचा येस बँकेला फायदा; शेअरच्या किमतीत १० टक्क्यांनी वाढ

केंद्र सरकारला महागाई दिसत नाही का?

पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. यापूर्वी पेट्रोलचे दर 60 ते 70 रुपये लिटर असताना सत्ताधारी भाजपकडून महागाईच्या नावाने आकांडतांडव केले जात होते. पेट्रोल व डिझेलचे दर वाढत असताना केंद्र सरकारला महागाई दिसत नाही का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा-विना परवाना सार्वजनिक वायफाय बसविता येणार; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

वाहने नाही तर सायकली चालवाव्या लागतील-

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांबाबत बोलताना नागरिकांनी ईटीव्ही भारतशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढत असल्याने आता वाहने चालवणे परवडत नाही. इंधनाचे दर असेच वाढत राहिले तर आता वाहने नाही तर सायकली चालवाव्या लागतील, असेही काही ग्राहकांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीचा परिणाम-

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरासंदर्भात शहरातील पेट्रोल पंप चालक दिलीप गांधी यांनी सांगितले की, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्यामागे आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेचा मोठा परिणाम होत असतो. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत, असे दिलीप गांधी म्हणाले.

Last Updated : Dec 9, 2020, 8:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.