ETV Bharat / business

शेअर बाजाराने ओलांडला ३९,००० चा टप्पा, १२०० अंशाने निर्देशांकात वाढ

बहुतांश मतदान निकालांच्या अंदाजात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला निवडणुकीत ३०० हून जागा मिळतील, अशी आकडेवारी समोर आली आहे. प्रत्यक्षात बहुमतासाठी २७२ जागा लागत असताना एनडीएला मिळणारे यश पाहता, स्थिर सरकार येण्याची चिन्हे आहेत. याचा परिणाम म्हणून शेअर बाजारात तेजीची लाट आली आहे.

शेअर बाजार
author img

By

Published : May 20, 2019, 1:05 PM IST

Updated : May 20, 2019, 2:53 PM IST

मुंबई - मतदान निकालाच्या अंदाजानंतर आजच्या पहिल्या सत्रात मुंबई शेअर बाजारात अभूतपूर्व तेजी आली आहे. शेअर बाजाराच्या निर्देशांकात १ हजार २८४ अंशाची वाढ होवून ३९, ००० टप्पा ओलांडला आहे.

शेअर बाजाराचा निर्देशांकदुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास १ हजार २८४ अंशाने वधारून ३९,२१५ वर पोहोचला. निफ्टीच्या निर्देशांकातही ३७० अंशाने वाढ होवून निफ्टी ११,७७७ वर पोहोचला.

सकाळच्या सत्रात शेअर बाजाराचा निर्देशांक ९६२ अंशाने वाढला. त्यानंतर ६८७.६३ अंशाने निर्देशांक वाढून ३८,६१८.४० वर पोहोचला. तर निफ्टीच्या निर्देशांकात २०३.०५ अंशाने वाढून ११,६१० वर पोहोचला. सकाळच्या सत्रात रुपया डॉलरच्या तुलनेत ७९ पैशांनी वधारला.

मारुती, एल अँड टी, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, आरआयएल, एम अँड एम, इंडुसलँड बँक, अॅक्सिक बँक, येस बँक आणि वेदांत यांचे शेअर ४ टक्क्याने वधारले आहेत. तर बजाज ऑटो, इन्फोसिस आणि एचसीएल टेकचे शेअर २ टक्क्यापर्यंत घसरले.

स्थिर सरकारच्या अंदाजाने शेअर बाजारात तेजी -

बहुतांश मतदान निकालांच्या अंदाजात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला निवडणुकीत ३०० हून जागा मिळतील, अशी आकडेवारी समोर आली आहे. प्रत्यक्षात बहुमतासाठी २७२ जागा लागत असताना एनडीएला मिळणारे यश पाहता, स्थिर सरकार येण्याची चिन्हे आहेत. याचा परिणाम म्हणून शेअर बाजारात तेजीची लाट आली आहे.

बाजाराने अपेक्षा केली होती, त्यापेक्षा मतदान निकालाचे अंदाज चांगले आल्याचे रिलायन्स सिक्युरिटीचे संशोधक प्रमुख नवीन कुलकर्णी यांनी सांगितले. याहून अधिक शेअर बाजार वधारू शकतो. मात्र, चलनाची कमी तरलता, मंदावलेली अर्थव्यवस्था आणि जागतिक आव्हाने यामुळे मर्यादा येत असल्याचे त्यांनी सांगितले. पायाभूत क्षेत्र आणि बँकिंग क्षेत्रांचे शेअर वधारू शकतात, असा त्यांनी अंदाज व्यक्त केला.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : May 20, 2019, 2:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.