नवी दिल्ली - मुंबई शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी पडझड सुरुच राहिल्याने गुंतवणुकदारांना मोठा फटका बसला आहे. गुंतवणुकदारांनी सुमारे ५.८६ लाख कोटी रुपये गमाविले आहेत. गेली काही दिवस विदेशी गुंतवणुकदार संस्थांनी भांडवली बाजारातून निधी काढून घेतल्याने शेअर बाजारात पडझड होत आहे.
शेअर बाजार निर्देशांक पाचही सत्रात एकूण १ हजार ३६७.९९ अंशाने घसरला आहे. तर, आज शेअर बाजार निर्देशांक हा १३५.०९ अंशाने घसरला आहे.
मुंबई शेअर बाजारामधील सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांनी किमान ५ लाख ८६ हजार ८.८८ कोटी गमाविले आहेत. तर किमान १ कोटी ४३ लाख २७ हजार ७९४.५४ रुपयांचे भांडवली मूल्य (एम-कॅप) गमावल्याचा अंदाज आहे.
यामुळे शेअर बाजारात होत आहे पडझड-
जागतिक आर्थिक मंचावरील प्रतिकूल स्थिती आणि मंदावलेली अर्थव्यवस्था यामुळे सलग पाचव्या सत्रात शेअर बाजाराचा निर्देशांक घसरला आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेची ३०-३१ जुलैला बैठक आहे, याकडे जगभरातील गुंतवणुकदारांचे लक्ष असल्याचे रिलिगरी ब्रोक्रिंगचे उपाध्यक्ष अजित मिश्रांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचे सकल उत्पन्न (जीडीपी) हे कमी होईल, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांची चिंता वाढल्याचे बाजार विश्लेषकांनी सांगितले.
जिओजीट फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य संशोधक विनोद नायर म्हणाले, अर्थव्यवस्था मंदावलेली आहे. त्यामुळे गुंतणुकदारांनी शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे.