नवी दिल्ली- सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा 48 रुपयांनी घसरून 47,814 रुपये आहेत. जागतिक बाजारातील स्थितीने सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 47,862 रुपये होता.
सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी चांदीचे दर वधारले आहेत. चांदीचे दर प्रति किलो 340 रुपयांनी वधारून 70,589 रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो 70,249 रुपये होता.
हेही वाचा-जुन्याच किमतीने मिळणार डीएपी खताचे पोते; केंद्राकडून अनुदानाला मंजुरी
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे दर स्थिर राहिले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस 1,859 डॉलर आहे. तर चांदीचा दर प्रति औंस हा 27.78 डॉलर आहे.
हेही वाचा-COVAXIN च्या निर्मितीत गोवंशाच्या सीरमचा वापर नाही- आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
काय आहे तज्ज्ञांचे मत?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल म्हणाले, की डॉलरचे मूल्य बळकट झाल्याने सोन्याचे दर घसरले आहेत. ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार हे अमेरिकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी म्हणाले, की गेल्या आठवडभरात सोन्याच्या किमतीने नीचांक गाठला आहे.
हॉलमार्किंगच्या नियमात सराफा व्यावसायिकांना दिलासा-
सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये, म्हणून केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करणे देशभरातील ज्वेलर्सला बंधनकारक केले. या निर्णयाची अंमलबजावणी 16 जूनपासून होणार होती. परंतु, या निर्णयाला सराफांनी विरोध दर्शवल्याने केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेतले आहे. काही बाबींना सूट दिली आहे. हॉलमार्किंगची सक्ती आता टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे. 40 लाख रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या सराफांना हॉलमार्किंग सक्तीचे असणार आहे. दुसरीकडे, जुने दागिने विकण्यास दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. परंतु, यालाही सराफांचा विरोधच आहे.