नवी दिल्ली - सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा २५० रुपयांनी वाढून ४६,२७७ रुपये आहेत. जागतिक बाजारात सोन्याचे वाढलेले दर आणि रुपयाची डॉलरच्या तुलनेत घसरण या कारणांनी सोन्याचे दर वाढले आहेत.
मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४६,०२७ रुपये होता. दिल्लीत सोन्याचा दर प्रति तोळा ४६,२७७ रुपये आहे. सोन्यापाठोपाठ चांदीचे दर प्रति किलो २५८ रुपयांनी वाढून ६६,८४२ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६६,०२७ रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढून प्रति औंस १,७८२ डॉलर आहेत. चांदीचे दर अंशत: वधारून प्रति औंस २६.०५ डॉलर आहेत. गेल्या १५ महिन्यात सोन्याचे दर सर्वाधिक कमी झाल्यानंतर चांदीचे दर पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे.
हेही वाचा-मारुती सुझुकीकडून वाहनांच्या किमतीत वर्षभरातच तिसऱ्यांदा होणार दरवाढ
गुंतवणुकीसह खरेदीदारांना नामी संधी
गेली काही दिवस सोने व चांदीच्या दरामध्ये चढ-उतार सुरू आहेत. त्याबाबत बोलताना जळगाव जिल्हा सराफ असोसिएशनचे सचिव स्वरुपकुमार लुंकड यांनी गुरुवारी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या अमेरिकन डॉलरचे अवमुल्यन झाले आहे. त्यामुळे, सोने व चांदीचे दर कमी होत आहेत. स्थानिक बाजारपेठेतही सोने व चांदीचे दर मोठ्या प्रमाणावर घसरत असून, ही एकप्रकारे गुंतवणुकीसह खरेदीदारांना नामी संधी चालून आली आहे. भविष्यातही डॉलर कमकुवत होत गेला, तर हे दर अजून खाली येतील, असेही लुंकड यांनी गुरुवारी सांगितले.
हेही वाचा-फेसबुकसह व्हॉट्सअपची चौकशी प्रकरण: दिल्ली उच्च न्यायालयाकडून निकाल राखीव