ETV Bharat / business

सोन्याच्या दरात प्रति तोळा ११६ रुपयांची वाढ; चांदीच्या दरात घसरण - सोने दर न्यूज

सोन्याचे दर वधारले असले तरी चांदीचे दर घसरले आहेत. चांदीचा दर प्रति किलो ११७ रुपयांनी घसरून ६५,२९९ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६५,४१६ रुपये होता.

gold rate news
सोने दर न्यूज
author img

By

Published : Mar 23, 2021, 4:57 PM IST

नवी दिल्ली - सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा ११६ रुपयांनी वाढून ४४,३७४ रुपये आहेत. जागतिक बाजारात रात्रीत सोन्याचे दर वाढल्याने हा परिणाम झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४४,२५८ रुपये होते.

सोन्याचे दर वधारले असले तरी चांदीचे दर घसरले आहेत. चांदीचा दर प्रति किलो ११७ रुपयांनी घसरून ६५,२९९ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६५,४१६ रुपये होता.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल म्हणाले की, दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर हा प्रति १० ग्रॅमला ११६ रुपयांनी वाढला आहे. जागतिक बाजारात सोन्याचे वाढलेले दर आणि रुपयाचे वाढलेले मूल्य या कारणांनी सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. मंगळवारी रुपयाचे सकाळच्या सत्रात मूल्य डॉलरच्या तुलनेत ३ पैशांनी वाढ ७२.३४ रुपये आहे.

हेही वाचा-शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर २८० अंशाने वधारला; रिलायन्ससह एचडीएफसीचे शेअर तेजीत

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यासह चांदीचे स्थिर राहिले आहेत. सोन्याचे दर प्रति औंस १,७३८ डॉलर तर चांदीचे दर प्रति औंस २५.५३ डॉलर आहेत.

हेही वाचा-मारुतीनंतर निस्सानही वाहनांच्या वाढविणार किमती

दरम्यान, कोरोनाबाधितांचे देशात आणखी प्रमाण वाढत असल्याने सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू आहे. अस्थिरतेच्या काळात सोन्यामधील गुंतवणूक सर्वाधिक सुरक्षित मानली जाते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.