नवी दिल्ली - सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा (१० ग्रॅम) ३६ रुपयांनी वधारून ४७,५०९ रुपये आहेत. जागतिक बाजार सोन्याचे दर वाढल्याने हा परिणाम झाल्याने एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
जागतिक बाजारातील स्थितीचा सोन्याच्या दरावर परिणाम होत आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४७,४७३ रुपये होता. आजच्या सत्रात सोने प्रति तोळा ४७,५०९ रुपये आहे. चांदीचा दर प्रति किलो ४५४ रुपयांनी वधारून ६९,०३० रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६८,४७३ रुपये होता.
हेही वाचा-अर्थसंकल्पात गरिबांसह बेरोजगारांकडे दुर्लक्ष- पी. चिदंबरम यांची राज्यसभेत टीका
ऐन लग्नसराईत घसरले सोने-
गेल्या काही महिन्यांत सोने व चांदीचे दर खूप वाढले होते. सोन्याच्या दराने ५० हजार तर चांदीच्या दराने ७५ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, आयात शुल्क कमी केल्याने सोन्याचे दर कमी होत आहेत. ऐन लग्नसराईत सोन्याचे दर घसरल्याने किरकोळ ग्राहकांना दिलासा मिळाला असून, त्यांना सोने खरेदीचा आनंद घेता येणार आहे.
दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये चढ-उतार सुरू आहेत.
हेही वाचा-अर्थसंकल्पावरील प्रश्नांना केंद्रीय अर्थमंत्री राज्यसभेत देणार उत्तर