ETV Bharat / business

सोने १४७ रुपयांनी स्वस्त; चांदीच्या दरात १,०३६ रुपयांची वाढ - gold rate in New Delhi

सोन्याचे दर घसरले असले तरी चांदीचे दर वधारले आहेत. चांदीचे दर प्रति किलो १,०३६ रुपयांनी वधारून ६४,२७६ रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६३,२४० रुपये होता.

gold rate news
सोने दर न्यूज
author img

By

Published : Mar 26, 2021, 6:56 PM IST

मुंबई - सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा (१० ग्रॅम) १४७ रुपयांनी घसरून ४४,०८१ रुपये आहेत. रुपयाचे डॉलरच्या तुलनेत वाढलेले मूल्य, रात्रीनंतर सोन्याची जागतिक बाजारात वाढलेली विक्री याचा सोन्याच्या दरावर परिणाम झाला आहे.

मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४४,२२८ रुपये होता. सोन्याचा आज दर प्रति तोळा ४४,०८१ रुपये आहे. सोन्याचे दर घसरले असले तरी चांदीचे दर वधारले आहेत. चांदीचे दर प्रति किलो १,०३६ रुपयांनी वधारून ६४,२७६ रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६३,२४० रुपये होता.

हेही वाचा-दिवसाखेर शेअर बाजाराचा ५६८ अंशाने वधारला निर्देशांक

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर अंशत: घसरून प्रति औंस १,७२६ डॉलर आहेत. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस २५.१४ डॉलर असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल यांनी सांगितले. सकाळच्या सत्रात रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत १४ पैशांनी वाढून ७२.४८ रुपये आहे.

हेही वाचा-सायरस मिस्त्रींबरोबरील वादात 'सर्वोच्च' विजय; रतन टाटांनी ही' दिली प्रतिक्रिया

शेअर बाजाराचा वधारला निर्देशांक...

शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ५६८ अंशाने वधारला. तर निफ्टीने पुन्हा १४,५०० चा टप्पा गाठला आहे. एचडीएफसी ट्विन्स, एचयूएल आणि आयसीआयसीआय बँक या कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. बजाज फायनान्सचे सर्वाधिक ४ टक्क्यांहून अधिक शेअर वधारले होते. त्यापाठोपाठ टायटन, एशियन पेंट्स, एचयूएल, भारती एअरटेल, बजाज ऑटो आणि नेस्ले इंडियाचे शेअर वधारले आहेत. तर दुसरीकडे पॉवरग्रीड, इंडसइंड बँक, आयटीसी आणि मारुतीचे शेअर घसरले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.