मुंबई - कापूस पिकातील तणनियंत्रण वेळीच आटोक्यात आणणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे असते. ही गरज लक्षात घेवून हिटवीड मॅक्स हे तणनाशक गोदरेज अॅग्रोवेटने मे महिन्यामध्ये बाजारात आणले आहे. हे तणनाशक कापसाच्या पिकात वाढ होणाऱ्या बहुतेक तणांवर नियंत्रण ठेवते, असा कंपनीने दावा केला. तसेच २५ ते ३० दिवसांचे तणमुक्त पिक मिळवून देते, असे कंपनीने म्हटले आहे.
हिटवीड मॅक्सने पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत कमी खर्चात कापूस पिकातील तण व्यवस्थापन करता येते.
तणाचे व्यवस्थापन केल्याने वाढू शकते उत्पन्न
कापसाच्या शेतीत पिकातील तण व पिकावरील कीड ही वेळीच नियंत्रणात आणणे आवश्यक असते. तंत्रज्ञानातील बारकाव्यांची अपुरी माहिती आणि मानवी तण व्यवस्थापनावरील अवलंबित्व यामुळे शेतकऱ्यांना कमी उत्पादनक्षमतेचा सामना करावा लागतो. पिकाच्या प्राथमिक टप्प्यात होणारी तणांची वाढ ही मोठी समस्या असते. कारण तण हे पिकाला मिळणारी महत्त्वाची पोषकतत्वे स्वतःकडे खेचून घेतात. परिणामी पीक कमी येवून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.
हिटवीड मॅक्स हे कापसाच्या पिकासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात ते तणावर नियंत्रण ठेवते. हिटवीड मॅक्स मोठ्या तसेच छोट्या पानांच्या तणांवर नियंत्रण मिळवते. त्यामुळे जास्त उत्पादन मिळते. त्याचबरोबर हिटवीड मॅक्सद्वारे मिळणारे हे नियंत्रण दीर्घकालीन असल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा त्रासाला सामोरे जावे लागत नाही. हे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवून सिद्ध केल्याचे गोदरेज अग्रोव्हेटचे व्यवस्थापकीय संचालक बलराम यादव यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, गेल्या तीन दशकांपासून आम्ही शेतकऱ्यांबरोबर काम करत आहोत. त्यांचे जीवनमान बदलण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. तसेच शेतीचे आर्थिक गणित सुधारत आहोत. लाँच केलेले हिटवीड मॅक्स हे उत्पादन त्याच तत्वांशी सुसंगत आहे.
कंपनीने या राज्यात हिटवीड मॅक्स उपलब्ध करणार-
कापसाची लागवड केल्या जाणाऱ्या राज्यात हिटवीड मॅक्स उपलब्ध केले जात आहे. यामध्ये महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश,गुजरात, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.
उच्च घनता लागवड यंत्रणा म्हणजे दाट रोपांची लागवड शक्य-
हिटवीड मॅक्सच्या वापरामुळे यांत्रिक किंवा मानवी हस्तक्षेपाद्वारे तण व्यवस्थापन करण्याची गरज राहात नाही. देशातील कापूस शेतकऱ्यांना उच्च घनता लागवड यंत्रणेचा (एचडीपीएस) वापर करणे शक्य होवू शकते. हिटवीड मॅक्स हे सर्व प्रकारच्या लागवड यंत्रणांअंतर्गत प्रभावी आहे. या यंत्रणेत रोपांची संख्या तुलनेने जास्त असते. त्यामुळे प्रती एकर जास्त उत्पादनक्षमता व नफा शेतकऱ्यांना मिळू शकतो.
यापूर्वी गोदरेज अग्रोव्हेटने देशांतर्गत व पेटंट असलेले हिटवीड तणनाशक विकसित केले. त्याच्या यशानंतर हिटवीड मॅक्स कंपनीने बाजारात आणले आहे.