नवी दिल्ली – गेल्या दोन महिन्यात पाचव्यांदा विमान इंधनाचे दर वाढले आहेत. विमान इंधनाचे दर आज 3 टक्क्यांनी वाढले आहेत, तर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे दर स्थिर राहिले आहेत.
विमान इंधनाचे दर (एटीएफ) हे प्रति किलोलीटर 1 हजार 304.25 रुपयांनी म्हणजे 3 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे दिल्लीत विमान इंधनाचा दर प्रति किलोलीटर 43 हजार 932.53 रुपये झाला आहे. यापूर्वी विमान इंधनाचे दर 16 जूनला 1.5 टक्क्यांनी म्हणजे प्रति किलोलीटर 635.47 रुपयांनी वाढले होते.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती रोज बदलण्यात येतात. पेट्रोल व डिझेलचे दर आज स्थिर राहिले आहेत. महिनाभरापासून पेट्रोलचे दर स्थिर राहिलेले आहेत. स्वयंपाकाच्या गॅसचे दर आज स्थिर राहिले आहेत. विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किमत 1 जूनला एका रुपयाने वाढून 594 रुपये झाली होती. गेल्या चार महिन्यात बिगर अनुदानित गॅस सिलिंडरची किमत कमी झाली आहे.
असे वाढले आहेत जूनमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर
दिल्लीत 29 जुलैपासून पेट्रोल प्रति लिटर 80.43 रुपयांनी विकण्यात येत आहे, तर डिझेलचा दर व्हॅटच्या कपातीनंतर प्रति लिटर 73.56 रुपये झाला आहे. पेट्रोलचे दर 7 जूनपासून प्रति लिटर एकूण 9.17 रुपयांनी वाढले आहेत. तर 7 जून ते 29 जूनपर्यंत डिझेलचे दर हे प्रति लिटर 12.55 रुपयांनी वाढले आहेत.
विमान इंधनाच्या दराचा दर महिन्याच्या 1 व 16 तारखेला आढावा घेण्यात येतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाचे दर व विदेशी चलन विनिमय दर यांचा विचार करून सरकारी तेल कंपन्यांकडून विमान इंधनाच्या दरात बदल करण्यात येतात.