टेक डेस्क - स्मार्टफोन कंपन्यांच्या गळेकापू स्पर्धेत टिकून राहाण्यासाठी अॅपलनेही कंबर कसली आहे. चीनी स्मार्टफोन कंपनी Huawei ने Huawei Mate 20 Pro मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा लाँच केला. अनेक अन्य स्मार्टफोन कंपन्यांनीही ट्रिपल कॅमेरे असलेले स्मार्टफोन लाँच केले आहेत. आता अॅपलही या कंपन्यांच्या पावलांवर पाऊल ठेवणार आहे.
Back from September 2019, I bring you the very 1st and very early glimpse at which I guess #Apple will unveil as #iPhoneXI!!! Yes, time has already come to meet the new #iPhone through gorgeous 5K renders made on behalf of new coming Partner @digitindia -> https://t.co/b6SxFUS2tx pic.twitter.com/97jrlTHQ5G
— Steve H.McFly (@OnLeaks) January 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Back from September 2019, I bring you the very 1st and very early glimpse at which I guess #Apple will unveil as #iPhoneXI!!! Yes, time has already come to meet the new #iPhone through gorgeous 5K renders made on behalf of new coming Partner @digitindia -> https://t.co/b6SxFUS2tx pic.twitter.com/97jrlTHQ5G
— Steve H.McFly (@OnLeaks) January 6, 2019Back from September 2019, I bring you the very 1st and very early glimpse at which I guess #Apple will unveil as #iPhoneXI!!! Yes, time has already come to meet the new #iPhone through gorgeous 5K renders made on behalf of new coming Partner @digitindia -> https://t.co/b6SxFUS2tx pic.twitter.com/97jrlTHQ5G
— Steve H.McFly (@OnLeaks) January 6, 2019
रिपोर्ट्सनुसार कंपनी iPhone 11 ट्रिपल रिअर कॅमेऱ्यासह लाँच करू शकते. स्मार्टफोन कंपन्यांमध्ये सध्या प्रचंड स्पर्धा वाढलेली आहे. प्रत्येक कंपनी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर भर देत आहे. त्यामुळे युजर्ससाठी भरपूर पर्याय उपलब्ध असले तरीही स्मार्टफोनची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना मात्र चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे.
नुकतेच iPhone 11 चे प्रोटोटाईप बॅक डिजाईन ट्विटरवर लीक झाले आहे. यामध्ये फोनच्या मागे ट्रिपल कॅमेऱ्यासाठी स्पेस दाखवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात iPhone 11 ट्रिपल रिअर कॅमेऱ्यासह लाँच होण्याच्या बातमीला आणखी बळ मिळत आहे. यासह अजून एका ट्विटमध्ये फोनच्या बॅकमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा दाखवण्यात आला आहे. मात्र कंपनीने यासंबंधी सध्या काही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे यावर कंपनी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.