नवी दिल्ली - देवाच्या कृत्यामुळे अर्थव्यव्यस्थेवर परिणाम झाल्याचे वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पी. चिदंबरम यांनी देवदूत म्हणत टोला लगावला आहे. चिदंबरम म्हणाले, की कोरोना महामारीपूर्वी अर्थव्यवस्थेचे चुकीच्या व्यवस्थापन कसे झाले, याचे देवदूत (गॉड ऑफ मेसेंजर) कसे वर्णन करणार आहेत, हे त्यांनी सांगावे.
पी. चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटले, की जर कोरोना महामारी हे देवाचे कृत्य असेल तर २०१७-१८ आणि २०१८-१९ मध्ये अर्थव्यवस्थेचे चुकीचे व्यवस्थापन झाल्याचे देवदुताने कारण द्यावे.
![पी. चिदंबरम यांचे ट्विट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/8600057_noname.png)
हेही वाचा-जीएसटी मोबदला देणे शक्य नाही; राज्यांपुढे आरबीआयसह बाजारातून कर्ज घेण्याचा सरकारचा प्रस्ताव
महामारीपूर्वी भारत अडखळला होता का? या प्रश्नाचे उत्तर केंद्रीय अर्थमंत्री देवदूत म्हणून देणार आहेत का? असा प्रश्न माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ट्विटमधून विचारला आहे.
![पी. चिदंबरम यांचे ट्विट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/8600057_3fgbv.png)
हेही वाचा-जीएसटी परिषद: विशेष खिडकीतून कर्ज घेण्यासाठी राज्यांना आठवडाभराचा वेळ
जीएसटी मोबदला थकित असताना राज्यांना कर्ज घेण्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. त्यावरूनही पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारने आर्थिक तणाव पूर्णपणे राज्यांवर लादल्याचा दावा चिदंबरम यांनी ट्विटमधून केला. जीएसटी मोबदला ही संपूर्णपणे केंद्र सरकारची जबाबदारी असल्याचे मत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले.