नवी दिल्ली - देशामधून अभियांत्रिकी उत्पादनांच्या होणाऱ्या निर्यातीत वाढ झाली आहे. यामध्ये मशिनरी, औद्योगिक उत्पादने, ऑटोमोबाईल्स आणि वाहनांचे सुट्टे भाग यांचा समावेश आहे. भारतामधून अमेरिका, चीन, जर्मनी आणि इटलीमध्ये एप्रिलमध्ये होणाऱ्या निर्याती वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारीमधून दिसून आले आहे.
भारतामधून सर्वाधिक अमेरिकेत अभियांत्रिकी उत्पादनांची निर्यात झाली आहे. त्यापाठोपाठ चीनमध्ये अभियांत्रिकी उत्पादनांची निर्यात झाली आहे. अमेरिकेत एप्रिलमध्ये निर्यात होणाऱ्या अभियांत्रिकी उत्पादनांच्या प्रमाणात ४०० टक्क्यांची वाढ झाली आहे. तर चीनमध्ये अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्यातीत १४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
हेही वाचा-मायक्रोसॉफ्टचे इंटरनेट एक्सप्लोअरर 'या' दिवशी घेणार निरोप
सुधारणा ही खरोखर प्रभावी
जहाज, बोटी यांच्या गटातील उत्पादनांच्या निर्यातीत वाढ झाली आहे. कोरोनाच्या काळातही ही निर्यात झाल्याचे इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन महेश देसाई यांनी सांगितले. मात्र, ही निर्यात केवळ आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत वाढ झाली आहे. मात्र, सुधारणा ही खरोखर प्रभावी असल्याचे देसाई यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
हेही वाचा-महिंद्रा अँड महिंद्राकडून सर्व वाहनांवरील वॉरंटीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
सरकारकडून निर्यातदारांना मदत मिळणे महत्त्वाचे
अभियांत्रिकीच्या ३२ उत्पादनांच्या निर्यातीत वाढ झाली आहे. त्यामध्ये लोखंड, स्टील आदींचा समावेश आहे. लॉकडाऊनचा आर्थिक चलवलनावर परिणाम होऊ नये, यासाठी सरकारने प्रयत्न केले आहेत. मात्र, तरीही उद्योग व व्यवसायांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकारकडून निर्यातदारांना मदत मिळणे महत्त्वाचे असल्याचे ईईपीसीचे चेअरमन महेश देसाई यांनी सांगितले.