नवी दिल्ली - तुमच्या वेतनामधून पीएफची रक्कम कपात होत असेल तर ही तुमच्यासाठी दिवाळीच्या तोंडावर आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून कर्मचारी भविष्य निधीकरिता (ईपीएफ) वार्षिक व्याज 8.5 टक्के देण्याची मंजुरी दिली आहे. ही माहिती सुत्राने दिली आहे.
वित्तीय सेवा विभाग (डीएफएस) हा वित्त मंत्रालयाचा विभाग आहे. या विभागाने ईपीएफओच्या 8.5 टक्के व्याजदराला मंजुरी दिली आहे. कामगार मंत्री संतोश गंगवार यांनी ईपीएफच्या व्याजदराबाबतचा निर्णय गतवर्षी मार्चमध्ये मंजुरी दिली होती.
हेही वाचा-शक्तिकांत दासच राहणार आरबीआयचे गव्हर्नर; तीन वर्षांसाठी कार्यकाळ वाढवला
सुत्राच्या माहितीनुसार 2020-21 मधील ईपीएफच्या रकमेवर व्याज जमा करण्यास सुरुवात होणार आहे. गतवर्षी मार्चमध्ये ईपीएफओचा व्याजदर हा 2019-20 साठी 8.5 टक्के करण्यात आला आहे. हा सात वर्षांमधील सर्वात कमी व्याजदर होता. 2018-19 मध्ये ईपीएफओचा व्याजदर हा 8.65 टक्के आहे.
हेही वाचा-आईने पोटच्या दोन पोरांवर फेकले रॉकेल, लावली आग, स्वतः घेतला गळफास
आजवर असा राहिला ईपीएफवर व्याजदर
यापूर्वी ईपीएफओने 2016-17 साठी 8.65 टक्के व्याजदर दिला आहे. तर 2017-18 मध्ये 8.55 टक्के व्याजदर दिला आहे. 2015 मध्ये ईपीएफवर वार्षिक 8.8 टक्के व्याजदर दिला आहे. 2013-14 आणि 2014-15 मध्ये ईपीएफवर 8.75 टक्के व्याजदर दिला आहे. तर 2012-13 मध्ये वार्षिक व्याजदर 8.5 टक्के दर देण्यात आला होता.
हेही वाचा-विद्यार्थाला दिली तालिबानी शिक्षा; शिक्षकाने चिमुकल्याला लटकवले उलटे
ईपीएफ रक्कम काढण्यासाठी नियम शिथील
यापूर्वीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कामगार मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निधी (ईपीएफ) योजनेच्या 6 कोटींहून अधिक भागधारकांना आपल्या खात्यातून पैसे काढण्याची परवानगी दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी विविध क्षेत्रातील 1.7 लाख कोटींच्या प्रोत्साहन पॅकेजच्या घोषणेवेळी याची माहिती दिली होती. कर्माचाऱ्यांना 3 महिन्याचे वेतन किंवा खात्यावरील एकूण जमा रकमेच्या तिसरा भाग यापैकी जी रक्कम कमी असेल ती काढता येणार आहे, अशी माहिती अधिसूचनेत दिली होती.