नवी दिल्ली - देशातील संरक्षण उत्पादनात मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्याकरता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सुधारणा जाहीर केल्या आहेत. संरक्षण उत्पादनात थेट विदेशी गुंतवणूक ही ४९ टक्क्यांवरून ७४ करण्याला परवानगी देण्यात आली आहे. तर काही शस्त्रास्त्रांच्या आयातीवर बंदी लागू करण्यात येणार आहे.
ज्या शस्त्रास्त्रांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे, त्यांची देशामधूनच खरेदी करण्यात येणार आहे. काही स्वदेशी शस्त्रास्त्रे खरेदी करण्यात येणार आहेत. देशातील स्वदेशी शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र व अतिरिक्त तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे आयातीच्या खर्चात मोठी बचत होणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
हेही वाचा-आठ क्षेत्रातील सुधारणांची घोषणा; संरक्षण क्षेत्रातील एफडीआयला ४४ टक्क्यांवरून ७४ टक्के परवानगी
आयुध निर्माण कारखान्यांचे कॉर्पोरेटायझेशन करण्यात येणार आहेत. त्यांची शेअर बाजारात सूचिबद्ध नोंदणी करण्यात येणार आहे. याचा अर्थ आयुध निर्माण कारखान्यांचे खासगीकरण करण्यात येणार नसल्याचेही स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिले. आयुध निर्माण कारखान्यांचे कॉर्पोटायझेन केल्याने व्यवस्थापन सुधारेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा-आर्थिक पॅकेज: खनिज उत्खननाला प्रोत्साहन; ३०० खाणींचा करण्यात येणार लिलाव