नवी दिल्ली - गेल्या १० वर्षात दिल्लीला ३२५ कोटी रुपये प्राप्तीकरातील हिस्सा म्हणून देण्यात येत आहेत. हा हिस्सा वाढवून कमीत कमी ६ हजार कोटी रुपये देण्यात यावेत, अशी दिल्ली राज्याचे अर्थमंत्री मनिष सिसोदिया यांनी मागणी केली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याबरोबर झालेल्या अर्थसकंल्पपूर्वीय बैठकीत दिल्लीचे अर्थमंत्री मनिष सिसोदिया यांनी काही मागण्या केल्या आहेत.
दिल्लीकडून केंद्र सरकारला १.५ लाख कोटींचा कर दिला जात आहे. इतर राज्यांना मात्र ४२ टक्के हिस्सा मिळत आहेत. गेल्या १८ वर्षे दिल्लीला फक्त ३२५ कोटी रुपये दिले जात आहे. दिल्लीसाठी ६ हजार कोटी रुपये हवे आहेत, असे सिसोदिया यांनी ट्विट केले आहे. तसेच नागरी संस्थेसाठी स्वतंत्र निधीची त्यांनी मागणी केली आहे. दिल्ली वगळता देशातील सर्व महानगरपालिकांना निधी दिला जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दिल्लीत आपचे सरकार असून अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री आहेत. अनेकदा केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारमध्ये विविध मुद्द्यावरून खटके उडाले आहेत.