ETV Bharat / business

पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या तोंडावर आरबीआय सक्रिय; १९४ चिट फंडचा करणार नव्याने तपास

आरबीआयच्या बाजार गुप्तचर विभागाकडून नियमितपणे जाहिराती व समाज माध्यमांतील जाहिराती पाहिल्या जात आहेत. त्यामधील काही जाहिरातींमधून आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखविले जात होते. त्यांच्यावर केंद्रीय मध्यवर्ती बँकेने त्वरित कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक
भारतीय रिझर्व्ह बँक
author img

By

Published : Dec 4, 2020, 7:40 PM IST

कोलकाता - ईडी, सीबीआय, गंभीर गुन्हे तपास कार्यालयासारख्या (एसएफआयओ) केंद्रीय संस्थांनी सहारा ग्रुप आणि रोझ व्हॅली ग्रुपवर कारवाई केली आहे. आता, श्चिम बंगालमधील निवडणुकीपूर्वी आरबीआयची मार्केट इंटेलिजिन्स विंग (एमआयडब्ल्यू) ही सक्रिय झाली आहे. चिट फंड कंपन्यांची एमआयडब्ल्यू ही पश्चिम बंगालमधील २०१५ पासून सुरू असलेल्या १,१९४ सूक्ष्म आणि लहान चिट फंडची नव्याने चौकशी सुरू करणार आहे.

आरबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटवीर सांगितले की, आरबीआयने पहिल्यांदा पश्चिम बंगाल सरकारला नोव्हेंबर २०१६ मध्ये सावधानतेचा इशारा दिला होता. यामध्ये १९४ चीट फंड आणि मल्टीलेव्हल मार्केटिंग (एमएलएम) संस्था आहेत. त्यावेळी आरबीआयने १९४ संस्थांची माहिती पश्चिम बंगालच्या राज्य सचिवांना दिली होती.

हेही वाचा-'लक्ष्मी विलास बँकेसह येस बँकेतील घडामोडीबाबत आम्हाला पूर्ण जाणीव होती'

आरबीआयच्या एमआयडब्ल्यूकडून होणाऱ्या चौकशीत राज्य सरकारने संबंधीत चिट फंडवर काय कारवाई केली, याचा तपास करणार आहे. तसेच या चिट फंडबाबत राज्य सरकारकडे कोणती अतिरिक्त माहिती आहे, याचीही आरबीआय तपास करणार आहे. रोझ ग्रुपच्या तुलनेत १९४ संस्थांनी पूर्णपणे कान बंद केले आहेत. जेव्हा आरबीआयकडून देखरेख सुरू झाली, तेव्हा त्या संस्थांचे अस्तित्व गायब झाले होते. जर या चिट फंडाविरोधात कारवाई केली नाही, तर श्रद्ध आणि रोझ व्हॅलीसारख्या घोटाळ्याचा मास्टमाईंड तयार होऊ शकतो, असा आरबीआय पश्चिम बंगाल सरकारला इशारा दिला होता.

हेही वाचा-'डिजीटल बँकिंगवरील ग्राहकांचा विश्वास टिकविणे गरजेचे असल्याने एचडीएफसी बँकेवर कारवाई'

आरबीआयची चिट फंडच्या जाहिरातींवर नजर-

धक्कादायक बाब म्हणजे १९४ चिट फंड हे गुप्तस्वरुपात कार्यरत असल्याचे आरबीआयला आढळले. आरबीआयच्या बाजार गुप्तचर विभागाकडून नियमितपणे जाहिराती व समाज माध्यमांतील जाहिराती पाहिल्या जात आहेत. त्यामधील काही जाहिरातींमधून आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखविले जात होते. त्यांच्यावर केंद्रीय मध्यवर्ती बँकेने त्वरित कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

ममता बॅनर्जींचा भाजपवर हा आहे आरोप

प्रत्यक्षात सत्ताधारी पक्षाने ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभागाविरोधा उग्र निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील आठवड्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काढलेल्या रॅलीत भाजपवर टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या, की जेव्हा निवडणूक येते, तेव्हा केंद्रीय संस्थांचा वापर करून भाजप तृणमुल काँग्रेसचे नेते आणि आमदारावर दबाव आणते. यावेळीसही तेच भाजर करणार आहे. येत्या काही दिवसात केंद्रीय संस्थांकडून काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. मात्र, मला भीती नाही. जर मला अटक करण्याची त्यांची इच्छा असेल तर करू द्यावे. मी तुरुंगात राहून निवडणूक लढवेन. मला खात्री आहे, तृणमुलचा विजय होणार आहे.

दरम्यान, राज्य ग्राहक व्यवहार मंत्री साधन पांडे यांच्याशी संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.