ETV Bharat / business

थेट जर्मनीवरून 23 ऑक्सिजन प्लांट विमानाने होणार आयात- संरक्षण विभागाचा निर्णय - Short Service Commissioned Doctors in AFMS

सशस्त्र दल वैद्यकीय सेवा विभागाकडून विमानाने जर्मनीहून 23 ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट आणण्यात येणार आहेत. हे प्लांट सैन्यदलाच्या रुग्णालयात कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी बसविण्यात येणार आहेत.

oxgyen tanker in Plane
ऑक्सिजन टँकर
author img

By

Published : Apr 23, 2021, 8:34 PM IST

गुवाहाटी- देशात ऑक्सिजनचा पुरवठा व निर्मिती कमी होत असताना संरक्षण दलही सक्रिय झाले आहे. संरक्षण विभागाच्या सशस्त्र दल वैद्यकीय सेवा (एएफएमएस) विभागाने ऑक्सिजन निर्मितीकरता लागणारे प्लांट आणि कंटेनर जर्मनीहून आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने हा निर्णय एएफएमएसने घेतला आहे.

सशस्त्र दल वैद्यकीय सेवा विभागाकडून विमानाने जर्मनीहून 23 ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट आणण्यात येणार आहेत. हे प्लांट सैन्यदलाच्या रुग्णालयात कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी बसविण्यात येणार आहेत. प्रत्येक प्लांटमधून प्रत्येक मिनिटाला 40 लिटर तर तासाला 2,400 लिटर ऑक्सिजन निर्मिती करण्याची क्षमता आहे. या क्षमतेने 20 ते 25 रुग्णांना 24 तास ऑक्सिजन पुरू शकतो. हे प्लांट पोर्टेबल म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी नेता येऊ शकतात. हे ऑक्सिजन प्लांट पुढील आठवड्यात भारतात दाखल होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-जळगावात 'रेमडेसिवीर'चा काळाबाजार करणाऱ्या टोळीला अटक; वितरणावरील नियंत्रणाचा प्रशासनाचा दावा फोल

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे संरक्षण दलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड डॉक्टरांच्या सेवेत 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ केली आहे. त्यामुळे सशस्त्र दल वैद्यकीय सेवा विभागात अतिरिक्त 238 उपलब्ध होणार आहेत.

एअर फोर्सद्वारे ऑक्सिजन टँकर नेण्यासाठी केंद्राची परवानगी

दरम्यान, महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसमोर आपले म्हणणे आज मांडले आहे. प्रामुख्याने ऑक्सिजनच्या मुद्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले, की ऑक्सिजनच्या दृष्टीने आम्हाला इतर राज्यांमधून जे ऑक्सिजन मिळेल, ते ऑक्सिजन येण्यासाठी उशीर होतो आहे. त्यामुळे आम्हाला ऑक्सिजन एअर लिफ्टिंग करून मिळेल का? अशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी विचारणा केली. अत्यंत सकारात्मक निर्णय यावेळी झाल्याचे टोपे यांनी सांगितले. आपल्याला ऑक्सिजन आणण्यासाठी ज्या राज्यातून कोटा मिळाला आहे. तिथे एअर फोर्सच्या मालवाहतूक विमानांमधून रिकामे टँकर्स पाठवले जातील. त्या टँकर्समध्ये ऑक्सिजन भरल्यानंतर रेल्वे मार्गाने किंवा जवळचे ठिकाण असेल, तर रस्ते मार्गाने ऑक्सिजन महाराष्ट्रात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

हेही वाचा-'विरार रुग्णालय आगीसंदर्भात आरोग्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य असंवेदनशील'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.