तिरुवनंतपुरम - देशातील समस्या सोडविण्यासाठी स्टार्टअप महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात, असे मत पेटीएमचे भारतीय प्रमुख सौरभ जैन म्हणाले. सरकार सर्व प्रश्न सोडवू शकत नाही; ते केवळ प्रेरणा देवू शकते, असेही त्यांनी म्हटले. ते 'हडल केरळ २०१९' या स्टार्टअपच्या आंतरराष्ट्रीय मेळाव्यात (कॉनक्लेव्ह) बोलत होते.
देशातील आंत्रेप्रेन्युअर हे सरकारच्या सहकार्याने प्रश्न सोडवू शकतात, असे पीटीएमचे भारतीय प्रमुख सौरभ जैन म्हणाले. उत्पादन, लोक आणि खरेदी करण्याची शक्ती या तीन गोष्टीवर स्टार्टअपने लक्ष केंद्रित करावे, असे जैन म्हणाले. तसेच केवळ प्रसिद्धी आणि पैशासाठी तरुण आंत्रेप्रेन्युअरनी उद्योगात येवू नये, असेही त्यांनी आवाहन केले. तरुणांनी प्रश्न सोडविण्यावर लक्ष केंद्रित करावे, असा त्यांनी सल्ला दिला. काळ्या पैशाची समस्या सोडविण्यासाठी डिजीटल पैशांचे महत्त्व असल्याचेही त्यांनी सांगितले.
'हडल केरळ' हा दोन दिवसांचा आशियामधील स्टार्टअपवरील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. केरळ स्टार्टअप मिशनने (केएसयूएम) या कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमासाठी केएसयूएमने इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाचे सहकार्य घेण्यात आले आहे.