मुंबई - मुकेश अंबानी यांच्या मालकीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज ही पेट्रोकेमिकल व्यवसायामधील २० टक्के हिस्सा सौदी अॅरेम्को कंपनीला विकणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हा व्यवहार चालू वर्षात ३१ मार्चपर्यंत होण्याची शक्यता आहे.
गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने केमिकल आणि रिफायनरी उद्योगातील २० टक्के हिस्सा सौदी अॅरेम्को कंपनीला विकण्याचा निर्णय जाहीर केला होता. हा सुमारे १.०६ लाख कोटी रुपयांचा सौदा असणार आहे. या सौद्यातून कंपनीवरील कर्जाचे प्रमाण कमी करण्याचा रिलायन्स इंडस्ट्रीजचा उद्देश आहे. तसेच तेलशुद्धीकरण प्रकल्पाला खनिज तेलाचा पुरसेा पुरवठा होण्यासाठी रिलायन्सकडून प्रयत्न करण्यात येत आहे.
हेही वाचा-देशातील 'या' प्रमुख उद्योजकांची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी घेतली भेट
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुख्य वित्तीय अधिकारी व्ही. श्रीकांत म्हणाले, हा मोठा व्यवहार आहे. सीमेपलीकडे होणारा गुंतागुंतीचा मोठा व्यवहार आहे. ही सौद्याची प्रक्रिया चांगल्या पद्धतीने पार पडत असल्याचेही त्यांनी सांगितले. सौद्याबाबत मार्गदर्शक तत्वे काय आहेत, हे सांगू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले. हा करार गोपनीय असल्याचेही व्ही. श्रीकांत यांनी सांगितले.
हेही वाचा-मारुतीने बीएस-६ इंजिन क्षमतेच्या 'या' मॉडेलचे केले लाँचिंग