ETV Bharat / business

बनारस हिंदू विद्यापीठाकडून नीता अंबानी यांच्या अभ्यागत प्राध्यापक नियुक्तीचा प्रस्ताव नाही-रिलायन्स

बनारस हिंदू विद्यापीठामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी निदर्शने केल्याचे काही माध्यमांनी वृत्त दिले आहेत. या विद्यार्थ्यांचा नीता अंबानी यांना अभ्यागत प्राध्यापक म्हणून विरोध आहे.

नीता अंबानी
Nita Ambani
author img

By

Published : Mar 17, 2021, 7:05 PM IST

मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालिका नीता अंबानी यांना बनारस हिंदू विद्यापीठासाठी अभ्यागत प्राध्यापक म्हणून शिकविण्याचा प्रस्ताव आलेला नाही. याबाबतचा खुलासा रिलायन्स इंडस्ट्रीजने केला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्थेला बोलताना सांगितले की, अभ्यागत प्राध्यापक म्हणून नीता अंबानी यांना कोणतेही निमंत्रण अथवा प्रस्ताव मिळालेले नाही. तसेच विद्यापीठाकडूनही नीता अंबानी यांना तसा प्रस्ताव मिळाला नाही.

हेही वाचा-नोकिया १० हजार कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढणार; 5 जी तंत्रज्ञानावर करणार लक्ष्य

विद्यार्थ्यांचा अंबानी यांच्या नियुक्तीला विरोध-

बनारस हिंदू विद्यापीठामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी निदर्शने केल्याचे काही माध्यमांनी वृत्त दिले आहेत. या विद्यार्थ्यांचा नीता अंबानी यांना अभ्यागत प्राध्यापक म्हणून विरोध आहे. निदर्शने करणारा विद्यार्थी शुभम तिवारी म्हणाले की, अंबानी यांच्याऐवजी महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी आदर्श घालून देणाऱ्यांना आमंत्रित करायला हवे.

हेही वाचा-आरबीआयने स्टेट बँकेला ठोठावला २ कोटींचा दंड

महिला अभ्यास आणि विकास केंद्राचे समन्वयक प्राध्यापक निधी शर्मा म्हणाल्या, की नीता अंबानी यांना अभ्यागत प्राध्यापक करण्यासाठी विविध यंत्रणांना प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. अंबानी या महिला आंत्रेप्रेन्युअर आहेत. जर त्या आमच्या केंद्रात सहभागी झाल्या तर, पूर्वांचलमधील महिलांना त्यांच्या अनुभवाचा फायदा मिळू शकणार आहे.

नुकतेच नीता अंबानी यांनी 'हर सर्कल' केले लाँच

रिलायन्स फाउंडेशन्सचे चेअरमन नीता मुकेश अंबानी यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी जागतिक महिला दिनानिमित्त 'हर सर्कल' हा व्यापकस्तरावरील सोशल मीडिया लाँच केला आहे. त्यामध्ये महिलांसाठी डिजीटल कंटेन्ट देण्यात आलेला आहे. डिजीटल क्रांतीची शक्ती ही महिलांच्या शक्तीला जोडणे हा उद्देश असल्याचे रिलायन्स फांउडेशनने म्हटले आहे. महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी पहिल्यांदाच अशा प्रकारचे डिजीटल माध्यम सुरू केल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.