ETV Bharat / business

पेटीएम एमएसएमई उद्योगांना देणार १ हजार कोटींचे कर्ज

पेटीएमकडून एमएसएमई उद्योगांना विना तारण ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण देण्यात येणार आहे. त्यासाठी कर्जाचा हप्ता दैनंदिन भरण्याचाही पर्यायही पेटीएमकडून उद्योगांना देण्यात येत आहे.

पेटीएम
पेटीएम
author img

By

Published : Nov 9, 2020, 3:09 PM IST

नवी दिल्ली - वित्तीय सेवा देणाऱ्या पेटीएमने कर्जवाटपाचे यंदा दुप्पट उद्दिष्ट निश्चित केले आहे. पेटीएमकडून एमएसएमई उद्योगांना मार्च -२१ पर्यंत १ हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे. गतवर्षी पेटीएमने ५५० कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले होते.

पेटीएमकडून एमएसएमई उद्योगांना विना तारण ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण देण्यात येणार आहे. त्यासाठी कर्जाचा हप्ता दैनंदिन भरण्याचाही पर्यायही पेटीएमकडून उद्योगांना देण्यात येत आहे. विना तारण कर्जातून किराणा दुकानदार आणि इतर लहान व्यावसायिकांना मदत करण्याचा प्रयत्न असल्याचे पेटीएम लेडिंगचे भावेश गुप्ता यांनी सांगितले. या व्यावसायिकांना बँकांकडून सहज कर्ज मिळत नाही, असेही गुप्ता यांनी सांगितले.

डिजीटल सेवा देणाऱ्या पेटीएमचा बाजारातील ऑफलाईन देयक व्यवहारात ५० टक्के हिस्सा आहे. पेटीएमच्या बिझनेस अ‌ॅपमधून मर्चंट लेंडिग कार्यक्रमातून विनातारण कर्ज उद्योगांना देण्यात येत आहे. कर्जासाठी अर्ज प्रक्रिया ते मंजुरीची सर्व प्रक्रिया डिजीटल पद्धतीने करण्यात आल्याने कोणतीही कागदपत्रे उद्योगांना द्यावी लागत नाहीत.

किराणा खरेदीवरही पेटीएमकडून कर्ज-

डिजिटल देयक व्यवहार करणाऱ्या पेटीएमने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टाळेबंदीत अनोखी सेवा लॉंच केली होती. ग्राहकांना नजीकच्या दुकान अथवा मॉलमध्ये खरेदी केल्यानंतर काही दिवसानंतर पैसे देण्याची सुविधा पेटीएमने उपलब्ध करून दिली होती. 'पेटीएम पोस्टपेड' असे या सेवेचे नाव आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.