ETV Bharat / business

एचडीएफसी बँकेचे मोबाईल अॅप तासभर डाऊन; बँकेकडून त्रुटी दूर - HDFC Bank latest news

मोबाईल बँकिंग अॅप्लिकेशनमध्ये अडथळा येत असल्याचे अनेक वापरकर्त्यांनी समाज माध्यमात तक्रारी केल्या आहेत. डाऊनडिटेक्टर या वेबसाईटच्या माहितीनुसार सकाळी पावणेअकरा वाजल्यापासून ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागले आहे.

HDFC Bank
एचडीएफसी बँक
author img

By

Published : Jun 15, 2021, 3:30 PM IST

नवी दिल्ली - एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना मोबाईल बँकिंग अ‌ॅप्लिकेशनचा वापर करताना अडचणींना मंगळवारी सामोरे जावे लागले. त्यावर प्राधान्याने काम करत असल्याचे एचडीएफसी बँकेने म्हटले आहे.

एचडीएफसी बँकेने ट्विट करत बँकिंग अॅप्लिकेशनवर प्राधान्याने काम करत असल्याचे म्हटले आहे. ग्राहकांनी बँकिंग अॅप्लिकेशनचा वापर करण्याऐवजी नेट बँकिंगचा व्यवहारासाठी वापर करावा, अशी एचडीएफसीने ग्राहकांना विनंती केली आहे. आम्हाला मोबाईल बँकिंग अॅपमध्ये काही अडचणींचा अनुभव येत आहे. त्याबाबत लवकरच अपडेट माहिती दिली जाईल. ग्राहकांच्या गैरसोयीबद्दल बँकेने दिलगिरी व्यक्त केली आहे.

हेही वाचा-किरकोळ बाजारपेठेत महागाई वाढून मे महिन्यात ६.३ टक्क्यांची नोंद

ग्राहकांनी सोशल मीडियावर केली तक्रार-

मोबाईल बँकिंग अॅप्लिकेशनमध्ये अडथळा येत असल्याचे अनेक वापरकर्त्यांनी समाज माध्यमात तक्रारी केल्या आहेत. डाऊनडिटेक्टर या वेबसाईटच्या माहितीनुसार सकाळी पावणेअकरा वाजल्यापासून ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागले आहे. यापूर्वी बँकेच्या ग्राहकांना मार्चमध्ये नेट बँकिंग आणि मोबाईल अॅपचा वापर करताना अडथळे आले होते.

हेही वाचा-मोफत धान्यांसह लसीकरणाकरिता सरकारवर अतिरिक्त १.०५ लाख कोटींचा भार- एसबीआय

आरबीआयकडून एचडीएफसी बँकेच्या नव्या क्रेडिट कार्ड लाँचिंगवर निर्बंध

गतवर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीच्या डाटा सेंटरमधील वीज पुरवठा खंडित झाल्याने एचडीएफसी बँकेची इंटरनेट बँकिंग आणि देयक व्यवस्था ठप्प झाली होती. त्यानंतर आरबीआयने डिसेंबरमध्ये एचडीएफसीला सर्व नवीन डिजीटल बिझनेस, नवीन क्रेडिट कार्ड लाँच करण्यावर निर्बंध लागू केले होते.

दरम्यान, फेब्रुवारीमध्ये आरबीआयने एचडीएफसी बँकेच्या सर्व पायाभूत सुविधांचे लेखापरीक्षण करण्यासाठी बाह्य व्यावसायिक आयटी संस्थेची नियुक्ती केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.