ETV Bharat / business

आयएल अँड एफएसमध्ये १ लाख कोटींचा घोटाळा; चेअरमन पार्थसारथीला चेन्नई पोलिसांकडून अटक - आयएल अँड एफएस घोटाळा

६३ मून्स टेक्नॉलीजी कंपनीने घोटाळ्यात २०० कोटी रुपये गमाविले होते. या कंपनीने तक्रार दिल्यावरून पार्थसारथी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पार्थसारथीला चेन्नई पोलिसांकडून अटक
पार्थसारथीला चेन्नई पोलिसांकडून अटक
author img

By

Published : Jun 11, 2021, 8:22 PM IST

चेन्नई - चेन्नई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने आयएल अँड एफएसमधील १ लाख कोटी रुपयांच्या घोटाळ्यात मोठी कारवाई केली आहे. घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार असलेल्या कंपनीच्या माजी चेअरमन रवी पार्थसारथीला पोलिसांनी अटक केली आहे. आयएल अँड एफएसमधील घोटाळ्यामुळे २०१८ मध्ये वित्तीय कंपन्यांमध्ये चलनाच्या वित्त पुरवठ्याची समस्या निर्माण झाली होती.

रवी पार्थसारथी हा आयएल अँड एफएस आणि ग्रुपचा माजी चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक होता. या ग्रुपमध्ये सुमारे ३५०हून अधिक कंपन्या होत्या. ६३ मून्स टेक्नॉलीजी कंपनीने घोटाळ्यात २०० कोटी रुपये गमाविले होते. या कंपनीने तक्रार दिल्यावरून पार्थसारथी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विविध ठेवीदारांसह भागीदारांनी चेन्नई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. तर, मद्रास न्यायालयाने पार्थसारथीचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.

हेही वाचा-चांदी प्रति किलो १,१४८ रुपये महाग; सोन्याच्या दरातही वाढ

पार्थसारथी हा केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम यांचा विश्वासू व्यक्ती

पार्थसारथी हा माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम यांचा विश्वासू व्यक्ती असल्याचे म्हटले जात आहे. पार्थसारथीच्या गैरकृत्यामुळे कंपनी, भागीदार आणि समभागधारकांचे नुकसान झाले. नुकसान झाल्याने कंपनीने अनेक कंपन्यांची कर्ज थकविण्यास सुरुवात केली.

हेही वाचा-आम्ही वित्तीय बाबतीत तज्ज्ञ नाही- सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली कर्जफेड मुदतवाढीची याचिका

लेखापरीक्षणातही पार्थसारथी आढळला दोषी-

ग्रँट थोरन्टॉन या फॉरेन्सिक ऑडीट कंपनीने आयएल अँड एफएस कंपनीचे लेखापरीक्षण केले. या परीक्षणामध्ये कंपनीत बेकायदेशीर प्रक्रिया, पतमानांकन संस्थांना लाच देणे असे गैरप्रकार झाल्याचे आढळून आले. यामध्ये आयएल अँड एफएस ग्रुपचे चेअरमन पार्थसारथी याचा समावेश असल्याचे ऑडीट कंपनीला आढळले आहे.

आरोपीला १५ दिवसांची पोलीस कोठडी

आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक प्रकाश बाबू यांनी पार्थसारथी यांच्या अटकेची पुष्टी दिली आहे. आरोपीला १५ दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. पार्थसारथीच्या जामीन अर्जावरील सुनावणी सोमवारी आहे.

आयएल अँड एफएसमुळे बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्र 2018 मध्ये होते संकटात -
आयएल अँड एफएसने ९० हजार कोटींहून अधिक कर्ज थकविले आहे. त्यानंतर बँकांनी बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्राला (एनबीएफसी) देण्यात येणाऱ्या कर्जासाठी कडक नियम लागू केले आहेत. याचा परिणाम म्हणून एनबीएफसी कंपन्या अधिक आर्थिक संकटात सापडतील व कर्ज थकवितील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण-

आयएल अँड एफएसचे ग्रँट थॉर्नटोन या कंपनीने विशेष लेखापरीक्षण केले आहे. या कंपनीने पतमानांकन संस्थांच्या वरिष्ठ अधिकारी व आयएल अँड एफएसमध्ये करण्यात आलेले ई-मेल मिळविले आहेत. त्यामधून पतमानांकन संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आयएल अँड एफएसच्या नाजूक आर्थिक परिस्थितीची माहिती होती, हे दिसून आले आहे. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये आयएल अँड एफएसच्या नव्या संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. या कंपनीने ९० हजार कोटींहून अधिक कर्ज थकविले आहे.

इक्रा आणि केअर या पतमानांकन संस्थेला प्रत्येकी २५ लाख रुपयांचा दंड

बाजार नियामक संस्था सेबीने इक्रा आणि केअर या पतमानांकन संस्थेला प्रत्येकी २५ लाख रुपयांचा दंड डिसेंबर २०१९ मध्ये ठोठावला होता. आयएल अँड एफएसची बिघडत जाणारी आर्थिक स्थिती ओळखण्यात पतमानांकन संस्थांना अपयश आल्याचा सेबीने ठपका ठेवला आहे. इक्रा आणि केअर पतमानांकन संस्थेने आयएल अँड एफएसमध्ये अप्रामाणिक हेतू ठेवला नसल्याचा कोणताही दावा नाही. मात्र, दोन्ही संस्थांचे अपयश हे दोष ठेवण्यास पात्र आहे. गुंतवणूकदार आणि नियामकांसाठी पतमानांकन संस्थेचे मत हे हॉलमार्कसारखे असते, असेही सेबीने आदेशात म्हटले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.