ETV Bharat / business

अदानी ग्रुप 'ही' कंपनी २५,५०० कोटी रुपयांना करणार खरेदी

अदानी ग्रीन एनर्जी लि. कंपनीने सॉफ्टबँक आणि भारती ग्रुपबरोबर एसबी एनर्जी इंडियाचे १०० टक्के शेअर खरेदी करण्यासाठी करार केला आहे. हा व्यवहार ३.५ अब्ज डॉलर म्हणजे भारतीय मुल्यात सुमारे २५,५०० कोटी रुपयांचा असणार आहे.

गौतम अदानी
गौतम अदानी
author img

By

Published : May 19, 2021, 7:52 PM IST

नवी दिल्ली - अब्जाधीश गौतम अदानी ग्रुपने सॉफ्टबँक ग्रुप कॉर्प्सची मालकी असलेली अक्षय उर्जेचा व्यवसाय खरेदी करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी अदानी ग्रुपकडून सॉफ्टबँकला सुमारे २५,५०० कोटी रुपये देण्यात येणार आहे. त्यामुळे गौतम अदानी ग्रुप जगातील सर्वात मोठी सौर उर्जा कंपनी होणार आहे.

अदानी ग्रीन एनर्जी लि. कंपनीने सॉफ्टबँक आणि भारती ग्रुपबरोबर एसबी एनर्जी इंडियाचे १०० टक्के शेअर खरेदी करण्यासाठी करार केला आहे. हा व्यवहार ३.५ अब्ज डॉलर म्हणजे भारतीय मुल्यात सुमारे २५,५०० कोटी रुपयांचा असणार आहे. हा अक्षय उर्जा क्षेत्रातील सर्वात मोठा सौदा ठरणार आहे.

हेही वाचा-होंडापाठोपाठ बजाज ऑटोकडून मोफत सेवेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

२०३० पर्यंत जगातील सर्वात मोठी अक्षय कंपनीचे उद्दिष्ट निश्चित

अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी म्हणाले, की जानेवारी २०२० मध्ये जे ग्रुपने व्हिजनमध्ये ठेवले होते, त्यादृष्टीने ठेवलेले पाऊल आहे. २०२५ पर्यंत जगातील सर्वात मोठी सौर उर्जा कंपनी होण्याचे कंपनीने नियोजन केले आहे. त्यानंतर २०३० पर्यंत जगातील सर्वात मोठी अक्षय कंपनीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. अक्षय उर्जेचा प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी आम्ही जागतिक उद्योगांना आकर्षित करत आहोत. त्यासाठी कार्बन फुटप्रिंटचे प्रमाण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

हेही वाचा-रॉयल एन्फील्डने परत मागविले 'ही' २.३६ लाख वाहने; इग्निशन कॉईल आढळले सदोष

भारती एन्टरप्रायझेसचे चेअरमन सुनील भारती म्हणाले, की अदानी ग्रुपने हरित उर्जेचे पॉवरहाऊस तयार करण्यामध्ये असाधारण रेकॉर्ड तयार केले आहे. एसबी एनर्जीमुळे या क्षमतेत काही पटींनी वाढ होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.