नवी दिल्ली - अबुधाबीच्या सार्वजनिक संपत्ती निधीला (एसडब्ल्यूएफ) गुंतवणुकीवर केंद्र सरकारकडून १०० टक्के प्राप्तिकरात सवलत देण्यात येणार आहे. दीर्घकाळासाठी पायाभूत गुंतवणुकीकरता केलेल्या गुंतवणुकीवर देशात प्रथमच अशी सवलत देण्यात आलेली आहे.
केंद्र सरकारने वित्तीय कायदा २०२० नुसार विशेष पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या सार्वभौम निधीला १०० टक्के प्राप्तिकरात सवलत देण्यात येते. यामागे देशातील पायभूत क्षेत्रा दीर्घकाळासाठी गुंतवणूक वाढविणे हा उद्देश आहे.
अबुधाबीचा सार्वभौम संपत्ती निधी हा द एमआयसी रेडवूड १ आरएससी लिमिटेड कंपनीच्या मालकीचा आहे. केंद्र सरकारने गुंतवणुकीतून मिळणारा लाभांश आणि व्याजावरील उत्पन्नावर १०० टक्के प्राप्तिकरात सवलत देण्यात येणार आहे. याबाबतची अधिसूचना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने सोमवारी काढली आहे.
उद्योगानुकलता: करातील सवलत अत्यंत वेगाने
कोरोना महामारीत विदेशी गुंतवणूक वाढविण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. उद्योगानूकलतेसाठी सरकारने द एमआयसी रेडवूड १ आरएससी लिमिटेड कंपनीला वेगाने प्राप्तिकरात सवलत दिली आहे. कंपनीने १८ सप्टेंबर २०२० ला सीबीडीटीच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्राप्तिकरात सवलतीसाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला होता.