ETV Bharat / business

ट्विटरविरोधात संताप; अनेक वापरकर्त्यांच्या टाईमलाईनमध्ये अडथळा - ट्विटर डाऊन

ट्विटरवर चर्चा सुरू असतात. पण, सध्या सुरू आहे, चर्चा ट्विटर डाऊन झाल्याची!

Twitter outage
ट्विटरमध्ये तांत्रिक त्रुटी
author img

By

Published : Jul 1, 2021, 3:23 PM IST

Updated : Jul 1, 2021, 6:00 PM IST

हैदराबाद- केंद्र सरकारबरोबर वाद सुरू असलेल्या ट्विटरच्या वापरकर्त्यांना तांत्रिक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. ट्विटरवर अनेक वापरकर्त्यांना ट्विट दिसत नव्हते. त्यावर काम सुरू असल्याचा संदेश ट्विटरवर दिसत होता.

देशभरातील वापरकर्त्यांना ट्विटरमध्ये वापरताना तांत्रिक अडथळा दिसून आला. त्याबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे. यापूर्वीही एप्रिलमध्ये असाच प्रकार घडला होता.

ट्विटर कंपनीचे ट्विट
ट्विटर कंपनीचे ट्विट

हेही वाचा-अमेरिकन कायद्याचा वापर केल्यावरून रवीशंकर प्रसादांचा ट्विटरला टोला

ट्विटरने ट्विट करून म्हटले की, प्रोफाईलमध्ये ट्विट आता दिसायला पाहिजेत. मात्र, वेबवर ट्विट कदाचित दिसू शकणार नाहीत. सर्व स्थिती सामान्य होईपर्यंत काम सुरुच ठेवणार आहोत. मात्र, त्यानंतरही वापरकर्त्यांना त्याच समस्येला तोंड द्यावे लागले.

ट्विटरचे ट्विट
ट्विटरचे ट्विट

हेही वाचा-वादाला फुटले नवे तोंड; ट्विटरने नकाशातून वगळले जम्मू काश्मीर!

केंद्रीय मंत्र्यांचा ट्विटरला गर्भित इशारा-

केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी त्यांचे अकाउंट काही काळ बंद झाल्यावरून ट्विटरवर कठोर टीका केली. ते म्हणाले की, मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या चांगला पैसे कमवितात. चांगला नफा कमवितात. हे फक्त जर तुम्ही देशातील नियमांचे पालन केले तर शक्य होईल, असा गर्भित इशाराही केंद्रीय मंत्र्यांनी ट्विटरला दिला आहे.ट्विटरने कॉपीराईट कायद्याचा वापर करून अकाउंट ब्लॉक केले होते. तेव्हा त्यांना भारतीय कायद्याचे ज्ञान अवगत असायला हवे, असा टोला केंद्रीय मंत्र्यांनी ट्विटरला लगावला आहे.

हेही वाचा-ट्विटर आणखी अडचणीत; दिल्ली पोलिसाकडून पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये सतत वाद सुरू-

सोशल मीडियाच्या नवीन नियमाप्रमाणे ट्विटरने मुख्य अंमलबजावणी अधिकाऱ्याची सविस्तर माहिती दिली नव्हती. केंद्र सरकारने तंबी दिल्यानंतर ट्विटरने वकिलाची माहिती ही नोडल संपर्क व्यक्ती आणि तक्रार निवारण अधिकारी म्हणून पाठविली होती. त्यानंतर ट्विटरने नेमलेल्या अधिकाऱ्यानेही नोकरीचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियाच्या नव्या कायद्याला ट्विटर जुमानत नसल्याचा आरोप केंद्रीय माहिती रवीशंकर यांनी वारंवार केला आहे.

नुकतेच, दिल्ली पोलिसांनी पोक्सा कायद्यांतर्गतही ट्विटरविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

Last Updated : Jul 1, 2021, 6:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.