नवी दिल्ली - टिकटॉकसह हॅलोची मालकी असलेल्या चिनी कंपनी बाईटडान्सने देशातील व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने अॅपवरील बंदी कायम ठेवल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
टिकटॉकचे हंगामी जागतिक प्रमुख व्हॅनेसा पापस आणि उपाध्यक्ष ब्लॅक चँडली यांनी संयुक्तपणे कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठविला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत असल्याचे म्हटले आहे. त्याचा देशातील सर्व कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार असल्याचे टिकटॉकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ई-मेलमध्ये म्हटले आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भविष्यात भारतामध्ये येण्याबाबत अनिश्चितता व्यक्त केली आहे. मात्र, वेळ आल्यावर भारतात परत येऊ, अशी त्यांनी आशाही व्यक्त केली आहे.
हेही वाचा-अर्थसंकल्प: ई-कॉमर्स उद्योगांकरता सरकार तरतूद करणार
२ हजार मनुष्यबळ कमी होणार-
टिकटॉकच्या प्रवक्त्याने की, केंद्र सरकारने २९ जानेवारी २०२० प्रमाणे जारी केल्या आदेशांप्रमाणे कंपनीने नियमांचे पालन केले आहे. स्थानिक नियम व कायद्यांचे पालन करण्यासाठी कंपनी सातत्याने काम करत आहे. सात महिने होऊनही अॅप सुरू करण्याची परवानगी दिली नाही, हे निराशाजनक आहे. देशातील २ हजार कर्मचाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. आम्हाला हे मनुष्यबळ कमी करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्प: आरोग्य क्षेत्राकरता तरतूद वाढविण्याची गरज
दरम्यान, केंद्र सरकारने टिकटॉक आणि हॅलोसह ५९ अॅपवर बंदी लागू केली आहे. हे चिनी अप देशाची सुरक्षा व एकतेला बाधा निर्माण करत असल्याचे केंद्र सरकारने बंदी लागू केलेल्या आदेशात म्हटले आहे.