हैदराबाद (तेलंगाणा) - तेलंगाणा सरकारने मनोरंजन क्षेत्राला मोठा दिलासा दिला आहे. चित्रपट आणि टीव्ही मालिकांचे चित्रीकरण करण्याची तेलंगाणा सरकारने आज परवानगी दिली आहे.
तेलंगाणाचे मुख्यमंत्री केे. चंद्रशेखर राव यांनी चित्रपट निर्मातेे आणि मालिकांचे निर्माता यांना चित्रीकरण करण्याची परवानगी देणाऱ्या फाईलवर आज स्वाक्षरी केली.
चित्रीकरणादरम्यान मर्यादित कामगार उपस्थित राहूू शकणार आहे. चित्रीकरणासाठी सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन निर्मात्यांना करावेेेे लागणार आहेे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार निर्मितीनंतरच्या कामालाही परवानगी देण्यात आली आहेे.
मात्र, मुख्यमंत्री केसीआर यांनी चित्रपटगृहे सुुुरू करण्याची परवानगी दिली नाही. महामारीच्या संकटात केंद्र सरकारच्या सूचनांचे पालन करावे लागणार असल्याचे केसीआर यांनी म्हटले आहे.
यापूर्वी तेलगू चित्रपटसृष्टीतील काही दिग्गज लोकांनी चित्रीकरणासह इतर कामे सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती.
दरम्यान, तेलगू चित्रपटसृष्टी ही मोठ्या बजेटच्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. या मनोरंजन उद्योगावर अनेकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र गेली दोन महिने टाळेबंदी असल्याने त्यांना आर्थिक फटका बसला आहे.